मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दशकांपासूनचं नातं संपल; सौदी अरेबियाने पाकिस्तानविरोधात घेतला मोठा निर्णय़

दशकांपासूनचं नातं संपल; सौदी अरेबियाने पाकिस्तानविरोधात घेतला मोठा निर्णय़

सौदी अरेबियानेही पाठ फिरविल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत

सौदी अरेबियानेही पाठ फिरविल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत

सौदी अरेबियानेही पाठ फिरविल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत

    इस्लामाबाद/रियाद, 12 ऑगस्ट :  सौदी अरेबियाने पाकिस्तान (Pakistan) सोबत दशकांपासून सुरू असलेले संबंध संपवण्याची घोषणा केली आहे. काश्मीरसंबंधात परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एक विवादित वक्तव्यानंतर दोन्ही देशांंच्या संबंधात (Relation) कटुता येण्यास सुरुवात झाली आहे. सौदी अरेबियाची (Saudi Arabia) सोबत न मिळाल्याने कुरेशी यांनी एक विवादित वक्तव्य केलं आहे. ज्यानंतर रियाद यांनी हा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी रियादने इस्लामाबादला कच्चे तेल (Crude Oil) निर्यात आणि लोन देण्यावर रोख आणली होती. मीडिल ईस्ट रिपोर्टरनुसार रियादद्वारा घेतलेल्या एकांगी निर्णयानंतर आता पाकिस्ताननेही संबंध संपवणार असल्याचे सांगितले. 10 ऑगस्टला घेतला निर्णय 10 ऑगस्ट रोजी सौदी अरेबियाने पाकिस्तानला  (Pakistan) दिलेल्या एक बिलियन डॉलरचं कर्ज परत करण्यास सांगितलं आहे. पाकिस्तानने ठरविलेल्या वेळेच्या 4 महिन्यांपूर्वीत परत केलं आहे. असे असतानाही सौदी अरेबियाने पाकिस्तानला तेल निर्यात बंद केलं. सौदी अरेबियाने पाकिस्तानवरील ओझ कमी करण्यासाठी आणि परदेशी मुद्राचा खजिना भरण्यासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये 6.2 बिलियन डॉलरची रक्कम पाकिस्तानला दिली होती. ज्यामध्ये 3.2 बिलियन डॉलरचा वापर पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, आदी गोष्टींवर खर्च केला जात होता. हा करार मे 2020 मध्ये समाप्त झाला. मात्र सौदी अरेबियाने हा करार रिन्यू करण्याऐवजी तेलाची निर्यात थांबवली आणि एक बिलियन डॉलक कर्जाची वसूलीही पाकिस्तानकडून केली. मीडिल ईस्ट मॉनिटरच्या रिपोर्टनुसार जेव्हा क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानचा दौरा केला होता तेव्हा या करारावर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानला हा झटका अशावेळी बसला आहे जेव्हा आयएमएफकडून कोणतीही मदत मिळत नाही. आयएमएफ (International Monetary Fund) ने गेल्या 5 महिन्यांपासून कोणालाही मदत केली नाही. अशात सौदी अरेबियाचं कर्ज परत केल्यानंतर आता तेल खरेदीसाठी पाकिस्तानच्या केंद्रीय बँक (Pakistan Central Bank) वर वाईट परिणाम होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pak pm Imran Khan, Saudi arabia

    पुढील बातम्या