धक्कादायक! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या Boss ला ठार केलं म्हणून महिलेला फाशी

धक्कादायक! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या Boss ला ठार केलं म्हणून महिलेला फाशी

बलात्काराला विरोध करणाऱ्या महिलेलाच फाशी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यातही क्रौर्याची परिसिमा गाठत खुल्या रस्त्यावर सर्वांसमोर गळा कापण्यात आला.

  • Share this:

रियाध, 16 फेब्रुवारी : महिलांवरील अत्याच्याराने अलिकडच्या काळात भारतातील वातावरण ढवळून निघालं आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी महिलांना स्व संरक्षणाचे धडेही दिले जात आहेत. कोणी गैरवर्तन करत असेल तर त्याला तिथंच धडा शिकवण्यासाठी हे केलं जात आहे. असं असताना सौदी अरेबियामध्ये मात्र मुस्लिम कायद्याला मात्र ही गोष्ट मान्य नाही. बलात्काराला विरोध करणाऱ्या महिलेलाच फाशी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यातही क्रौर्याची परिसिमा गाठत खुल्या रस्त्यावर सर्वांसमोर गळा कापण्यात आला.

महिलेनं तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बॉसवर हल्ला केला होता. त्यात जखमी झालेल्या बॉसचा नंतर मृत्यू झाला. इंडोनेशियातील असलेल्या या महिलेवर असा अन्याय झाल्याने तिथल्या देशवासियांनी सौदी अरेबियाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. एका मुलाची आई असलेल्या तुती तुरसीलवाती हिला फाशी देण्यात आली. सौदी अरेबियातील मक्का प्रांतात हा प्रकार घडला. फाशी देण्याआधी तुतीच्या कुटुंबियांना किंवा तिथल्या इंडोनेशियाच्या दुतावासालाही कल्पना दिली नव्हती. ही घटना उघडकीस आल्यानंतर इंडोनेशियातील अनेक भागाता विरोध प्रदर्शन केलं जात आहे.

गेल्या तीन वर्षात इंडोनेशियाच्या 4 जणांना सौदी अरेबियात फाशी देण्यात आली आहे. याआधीही सौदीकडून असा प्रकार झाला आहे. याबाबत इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी सौदीला खडसावलं आहे. तसंच इंडोनेशियातील सौदीच्या दुतावासाला माहिती दिली आहे. फाशीच्या एक आठवडा आधी सौदीचे परराष्ट्र मंत्री अल जुबैर यांनी इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली होती. अनिवासी इंडोनेशियाच्या लोकांसोबतच्या वागणुकीचा मुद्दा त्यात होता. त्यावर फाशी देण्यापूर्वी संबंधित देशाला कळवलं पाहिजे अशंही म्हटलं गेलं होतं. मात्र याकडे सौदीने दुर्लक्ष केल्याचं इंडोनेशियाने म्हटलं आहे.

तरुणाने मुलीच्या वेशात येऊन वॉचमॅनचा कापला गळा, बारमध्ये सिगारेटच्या पैशाचा वाद

सौदी अरेबियात मुस्लिम शरिया कायदा लागू आहे. याठिकाणी गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. यात महिलांना खूपच कमी अधिकार दिले आहेत. यामुळे अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदीवर टीका केली जाते.

माझ्याविरुद्ध तक्रार का केली? नवऱ्यासह तिघांनी केली महिलेला मारहाण

First published: February 16, 2020, 9:30 PM IST

ताज्या बातम्या