अमेरिकेतील पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या!

अमेरिकेतील पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या!

अमेरिकेतील पहिले शिख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्याघालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

ह्यूस्टन, 28 सप्टेंबर: अमेरिकेतील पहिले शिख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्याघालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संदीप धालीवाल असे या शिख पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. संदीप यांनी 10 वर्षांपूर्वी अमेरिकेतील पोलिस दलात सहभागी झाले होते. दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी नॉर्थवेस्ट हॅरी काऊंटी येथील एका ट्रॅफिक स्टॉपवर संदीप धालीवाल तैनात होते. तेव्हा गाडीतून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. संदीप त्यांच्या पेट्रोलिग गाडीकडे जाण्यास निघाले तेव्हा हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोराने संदीप धालीवाल यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना संशयित म्हणून तब्यात घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडून बंदूक देखील सापडली आहे.

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. हत्या झाल्यानंतर हल्लोखोर एका मॉलमध्ये निघून गेले. संदीप धालीवाल त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते. शिख पोलिस अधिकारी म्हणून संदीप यांनी स्वत:च्या नावावर एक विक्रम देखील केला होता.

CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: USA
First Published: Sep 28, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या