News18 Lokmat

धक्कादायक, Samsung कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांचा कॅन्सरनं मृत्यू

सध्या सॅमसंग कंपनीचे कर्मचारी कॅन्सर आजारापासून त्रस्त झाले असून, कंपनीने त्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2018 11:45 PM IST

धक्कादायक, Samsung कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांचा कॅन्सरनं मृत्यू

दक्षिण कोरियात सॅमसंग इलेक्ट्रॉनीक्समुळे एक मोठा खुलासा समोर आला आहे. कंपनीच्या सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांची माफी मागून कामगारांना 95 लाखांची मदत जाहीर केली होती.

गेल्या दहा वर्षांपासून हा वाद सुरू होता. याप्रकणी कंपनीचे उपाध्यक्ष किम की नेम यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आणि कॅन्सर पिढीतांची माफी मागितली. त्याचबरोबर आम्ही सेमीकंडक्टर आणि कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकलो नाही अशी कबुलीदेखील किम यांनी मागितली.

सॅमसंग कंपनीच्या सेमी कंडक्टर आणि डिसप्ले कारखान्यातील 240 कर्मचाऱ्यांना कॅन्सर झाला होता त्यातील 80 लोकांचा मृत्यू झाला होता. 16 प्रकारच्या वेगवेगळ्या कॅन्सरपासून हे कर्मचारी त्रस्त होते. 1984 साली हे प्रकरण घडलं होतं आणि याचा 2007 मध्ये खुलासा करण्यात आला होता.

Loading...

या महिन्याच्या सुरुवातीला भरपाई निधीची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती याविरोधात अभियान चालवणाऱ्या समुहांनी दिली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला ही भरपाई निधीची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती याविरोधात अभियान चालवणाऱ्या समुहांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...