• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • आता तुम्हीही घरच्या घरी करू शकता Corona tets, व्हायरस पसरण्याचा धोकाही कमी होणार

आता तुम्हीही घरच्या घरी करू शकता Corona tets, व्हायरस पसरण्याचा धोकाही कमी होणार

कोरोना व्हायरचा प्रसार थांबविण्यासाठी जगभर औषध शोधण्यात येत आहे. मात्र त्यात यश आलेलं नाही. मात्र कोरोनाचं निदान करण्यासाठी आता नवं तंत्रज्ञान विकसित झालं आहे.

कोरोना व्हायरचा प्रसार थांबविण्यासाठी जगभर औषध शोधण्यात येत आहे. मात्र त्यात यश आलेलं नाही. मात्र कोरोनाचं निदान करण्यासाठी आता नवं तंत्रज्ञान विकसित झालं आहे.

अमेरिकेत लाळेमार्फत कोरोना टेस्ट (Saliva corona test) करणाऱ्या किटच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 09 मे : सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणं दिसू लागली की आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) तर झाला नाही ना? अशी भीती प्रत्येकाच्या मनात येते. मात्र कोरोना टेस्ट (corona test) करायची म्हटली की एखादा आरोग्य कर्मचारी घसा आणि नाकातील स्वॅब सॅम्पल घेतो. मात्र यामुळे अनेकदा आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. शिवाय एखादी व्यक्ती टेस्ट सेंटर्सवर जाऊन कोरोना टेस्ट करायचं म्हणाली तरी संक्रमणाचा धोका आहे. मात्र आता कोरोना संशयित व्यक्तीलाच घरच्या घरी कोरोना टेस्ट करता येणं शक्य आहे. तेदेखील फक्त लाळेचं नमुने घेऊन. सध्या तरी लाळेमार्फत कोरोना टेस्टला (Saliva corona test) अमेरिकेत (america) मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (America FDA) मंजुरी दिली आहे. हे वाचा - देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही रुग्ण नाही रुटगर्स युनिव्हर्सिटीच्या आययूसीडीआर इनफाइनाइट बायोलॉजिक्स लॅब आणि स्पेक्ट्रम सॉल्युसंस आणि अॅक्युरेट डायग्नोस्टिक्सने एकत्रितरित्या ही कोरोना टेस्ट तयार केली आहे. गेल्या महिन्यात एफडीएनं रुटगर्सला कोरोना संक्रमितांच्या लाळेचे नमुने जमा करण्याची परवानगी दिली होती. आता रुटगर्सचा हे किट घरच्या घरी वापरता येईल अशी कलेक्शन किट (Collection Kit) म्हणून विकण्यास मंजुरी दिली आहे. रुटगर्सने सांगितलं या टेस्टसाठी 100 डॉलर्स घेतले जातील. आरयूसीडीआरचे सीईओ डॉ. अँड्र ब्रुक्स यांनी सांगितलं, याचा वापर करणं खूपच सोपं आहे. कशी करावी टेस्ट? कोरोना संशयित व्यक्तीला घरच्या घरी करता येईल अशी ही टेस्ट किट आहे. या टेस्ट किटमधील ट्युबमध्ये आपली लाळ जमा करावी लागेल आणि ट्युबची कॅप बंद करून टेस्ट लॅबला पाठवावं लागेल. डॉ. ब्रुक्स यांनी सांगितलं की, ज्यांंच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत, त्याच लोकांनी याचा वापर करायला हवा. मात्र याच्या वापरासाठी मात्र डॉक्टरांची परवानगी घेणं गरजेचं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, या टेस्ट किटच्या मदतीनं दररोज 20,000 नमुन्यांची तपासणी करू शकतो, इतर लॅबनीही या किटनं तपासणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं रुटगर्सनं सांगितलं. लवकरात लवकर चाचण्या व्हाव्यात यासाठी एफडीएनं या टेस्ट किटला परवानगी दिली आहे. या टेस्ट किटमुळे संशयित रुग्णांना टेस्ट सेंटर्सवर येण्याची गरज नाही. घरीच ते आपले सॅम्पल लॅबला पाठवू शकतात. यामुळे संक्रमणही जास्त पसरणार नाही, असा दावा केला जातो आहे. घरच्या घरी कोरोना चाचणीसाठी मेड इन इंडिया टेस्ट किट भारतातही घरच्या घरी टेस्ट करण्यासाठी असं कोरोना टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. जिनोमिक्स बायोटेक या हैदराबादच्या कंपनीने या टेस्टिंग किट्सची निर्मिती केली आहे. एका टेस्टला 50 ते 100 रुपये एवढाच खर्च येणार आहे. या किट मान्यतेसाठी पुढच्याच आठवड्यात ICMR कडे पाठवण्यात येणार आहेत. हे वाचा - कोरोना चाचणी आता घरच्या घरी करणं शक्य होणार; मेड इन इंडिया टेस्ट किट तयार "मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करण्यासाठी रॅपिड टेस्ट करण्यात येते. ही कोरोनाव्हायरस आहे की नाही याची पहिली तपासणी असते. या अँटिबॉडी टेस्टिंगसाठी या किटचा उपयोग होईल," असं प्रा. पी. रत्नगिरी म्हणाले. ते जिनोमिक्स बायोटेकचे संस्थापक आहेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
  Published by:Priya Lad
  First published: