मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

देशासाठी तालिबानसोबत लढणाऱ्या सलिमाला अखेर अटक; शेवटच्या क्षणापर्यंत दिली झुंज

देशासाठी तालिबानसोबत लढणाऱ्या सलिमाला अखेर अटक; शेवटच्या क्षणापर्यंत दिली झुंज

देशाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या महिला सलीमा मजारी यांना तालिबानं पकडलं आहे.

देशाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या महिला सलीमा मजारी यांना तालिबानं पकडलं आहे.

Afghanistan Crisis: देशाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या महिला सलीमा मजारी (Salima Mazari Arrested) यांना तालिबानं पकडलं आहे. सलीमा या अफगाणिस्तान देशाच्या पहिल्या महिला गवर्नर (Afghaninstan First Female Governer) आहेत.

    काबूल, 18 ऑगस्ट: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान संघटना एकीकडे आपलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आपला खरा रंगही दाखवायला सुरुवात केली आहे. देशाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या महिला सलीमा मजारी (Salima Mazari Arrested) यांना तालिबानं पकडलं आहे. सलीमा या अफगाणिस्तान देशाच्या पहिल्या महिला गवर्नर (Afghaninstan First Female Governer) आहेत. अलीकडच्या काळात तालिबाननं देशात हिंसाचाराला सुरुवात केल्यानंतर सलीमा यांनी तालिबान विरोधात आपली स्वतःची फौज निर्माण (War against Taliban) केली होती. त्यांनी शेवटपर्यंत तालिबानशी लढा दिला आहे. तालिबानचा वाढता प्रभाव लक्षात घेता, अफगाणिस्तानचे अनेक नेते देश सोडून पळून जात होते. पण सलीमा मजारी या तालिबान विरोधात आपल्या काही सैनिकांसोबत एकट्या उभ्या होत्या. अफगाणिस्तानचा बल्ख प्रांतावर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर, बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यातील सलीमा मजारी यांना तालिबाननं अटक केली आहे. हेही वाचा-अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत विकतोय फ्रेंच फ्राईज; म्हणाला... अफगाणिस्तानच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनच महिला गवर्नर म्हणून नियुक्त झाल्या आहेत. सलीमा मजारी या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गवर्नर होत्या. सलीमा या बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. येथील एकूण लोकसंख्या जवळपास 32 हजारांहून अधिक आहे. पण त्यांनी शेवटपर्यंत तालिबानला आपल्या भागावर ताबा मिळवू दिला नाही. या भागासाठी तालिबान्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे. हेही वाचा-नवीन सरकारमध्ये अफगाण महिलांना स्थान मिळणार का? तालिबानचा मोठा निर्णय जन्म इराणमधील पण लढा अफगाणिस्तानसाठी सलीमा मजारी यांचा जन्म इराणमध्ये झाला होता. पण सोव्हिएत युद्धादरम्यान त्या अफगाणिस्तानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तेहरान विद्यापीठात शिक्षण घेतलं, अफगाणिस्तानच्या राजकारणाकडे वळाल्या. तालिबाननं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मभूमीसाठी तालिबानचा रोष ओढावून घेतला आहे. आपली सैन्यांची तुकडी उभी करून शेवटच्या क्षणापर्यंत तालिबानशी लढल्या. पण अखेर त्यांना तालिबाननं अटक केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या