भारत पहिल्यांदाच दक्षिण आशियाई देशांना देणार ही अनोखी भेट!

भारत पहिल्यांदाच दक्षिण आशियाई देशांना देणार ही अनोखी भेट!

सार्क देशांपैकी नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी या मोहिमेत होणार सहभागी

  • Share this:

30 एप्रिल :  भारताने आता अवकाशातही आपली मुत्सद्देगिरी दाखवण्यात यश मिळवलं आहे. भारत पहिल्यांदाच दक्षिण आशियाई देशांना 450 कोटी रुपयांची एक विशेष भेट देणार आहे.

ही अनोखी भेट म्हणजे - 'दक्षिण आशिया उपग्रह'. ​येत्या 5 मे रोजी इस्रो श्रीहरिकोटामधून 'नॉटी बॉय' या ११ व्या मोहिमेचं प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह शांतीसंदेश घेऊन जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपग्रहातून मिळालेला डेटा अर्थात माहिती ही 6 शेजारी देशांबरोबर भारत शेअर करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात' मध्येही या योजनेचा उल्लेख केला. त्यांनी याला दक्षिण आशियात 'सबका साथ सबका विकास' असं म्हटलंय.

हा प्रकल्प भारताकडून इतर दक्षिण आशियाई देशांना गिफ्ट आहे. सार्क देशांपैकी नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी या मोहिमेत सहभागी होण्यास सहमती दर्शवली असल्याचंही सांगण्यात येत आहे. पाकिस्तानला भारताकडून कोणतीही भेट नको असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने, पाकिस्तान या मोहिमेत सहभागी होणार नाहीये.

नैसर्गिक साधनसंपत्तीचं मॅपिंग करणं, शैक्षणिक संस्था कुठे उभारता येतील हे सुचवणं. अशा अनेक गोष्टी हा उपग्रह पाठवणार आहे.

उपग्रहाची वैशिष्ट्य :

या दक्षिण आशिया उपग्रहाचं प्रक्षेपण करणाऱ्या रॉकेटचं वजन 412 टन तर लांबी 50 मीटर आहे. या उपग्रहाचं वजन 2,230 कि. ग्रॅ. असून तो बनवण्यासाठी इस्रोला ३ वर्षं लागली. हा उपग्रह बनवण्यासाठी इस्रोला 235 कोटी रुपये खर्च आला. याचा उपयोग अवकाशावर आधारित तंत्रज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2017 08:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading