मॉस्को, 27 ऑगस्ट : एकीकडे जगभरातील देश कोरोनाची लस करण्यासाठी दिवस रात्र एक करीत आहेत. त्यादरम्यान (Coronavirus Vaccine) रशिया दुसरी कोरोनाच्या लशीची निर्मितीसाठी परवानगी देणार असल्याची बाब समोर आली आहे. (Russia) रशियाने यापूर्वी Sputnik V नावाची कोरोनाची लस लॉन्च केल्यानंतर आता रशिया आणखी एक कोरोना लशीला मंजूरी देत प्रॉडक्शनसाठी पाठविण्याच्या तयारीत आहेत.
वृत्त संस्था रॉयटर्सनुसार बुधवारी रशियाचे डेप्युटी पंतप्रधान तात्याना गोलिकोवा (Russian Deputy Prime Minister Tatiana Golikova) यांनी सांगितले की, सप्टेंबरच्या शेवटपर्यंत वा ऑक्टोबरपर्यंत याची तयारी पूर्ण करण्यात येईल. रशियाच्या टेलिव्हिजनवर प्रदर्शित केलेल्या एका सरकारी बैठकीत गोलिकोवा यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की, सायबेरियामध्ये वेक्टर वायरोलॉजी इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या या लशीचं क्लिनिकल ट्रायल सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण केलं जाईल. ते पुढे म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ज्यांना ही लस दिली गेली आहे, त्यांना या लशीमुळे कोणताही त्रास झालेला दिसून आला नाही.
Russia is preparing to approve a second vaccine against COVID-19 in late September or early October, Russian Deputy Prime Minister Tatiana Golikova said. https://t.co/9keYRPYgiw
— GMA News (@gmanews) August 26, 2020
स्पुत्निक-5 (Sputnik V) चं प्रोडक्शन सुरू
रशिया असा पहिला देश बनला आहे, जेथे दोन महिन्याहून कमी काळात ह्युमन ट्रायलनंतर गेमालेया इन्स्टिट्यूटच्या कोविड - 19 लशीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अंतराळात सोडलेल्या सोव्हियत संघाचा पहिला उपग्रह स्पुत्निकच्या आठवणीत या लशीचं नाव स्पुत्निक 5 ठेवण्यात आलं आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. मात्र पश्चिमी देशांतील काही तज्ज्ञांच्यामते या लशीच्या वापराबाबत इशारा देण्यात आला आहे. या लशीची आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षण केलं जायला हवं, असं सांगितले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Russia