Home /News /videsh /

विचित्र अपघातात रशियाच्या मंत्र्यांचा मृत्यू, कॅमेरामनला वाचवताना घसरला पाय

विचित्र अपघातात रशियाच्या मंत्र्यांचा मृत्यू, कॅमेरामनला वाचवताना घसरला पाय

रशियाचे (Russia) आपातकालीन खात्याचे मंत्री (Minister) येवगेनी जिनिचेव ( Yevgeny Zinichev) यांचा एका विचित्र अपघातात (Accident) मृत्यू (Death) झाला आहे.

    मॉस्को, 8 सप्टेंबर : रशियाचे (Russia) आपातकालीन खात्याचे मंत्री (Minister) येवगेनी जिनिचेव ( Yevgeny Zinichev) यांचा एका विचित्र अपघातात (Accident) मृत्यू (Death) झाला आहे. रशियातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीचा जीव वाचवताना त्यांचा मृत्यू झाला. जिनिचेव हे रशियाच्या आपातकालीन मंत्रालयाचे प्रमुख होते. एका सराव शिबिरादरम्यान त्यांचा अपघात झाल्याची माहिती आहे. , रशियातील सरकारी वृत्तवाहिनी आरटी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार जिनिचेव हे एका सैनिकी शिबीरासाठी हजर राहिले होते. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. या शिबीरात बांधण्यात आलेल्या एका जलाशयात एक कॅमेरामन बुडत असल्याचं जिनिचेव यांना दिसलं. त्याला वाचवण्यासाठी ते तिकडे धावले. त्यांनी कॅमेरामनला हात देण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात त्यांचाच पाय घसरला आणि ते जलाशयात पडले. जलाशयातील एका दगडावर डोकं आपटून त्यांचा मृत्यू झाला, तर कॅमेरामनचाही या घटनेत मृत्यू झाला. कुणाला काही कळायच्या आतच ही दुर्घटना घडली. लांबून हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांना जीवघेणी घटना घडल्याची कल्पनाही नव्हती. उपस्थितांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार नेमकं काय घडतंय याची कुणालाच कल्पना आली नाही. जिनिचेव हे पाण्यात पडलेल्या एका व्यक्तीला हात देऊन वर खेचण्याच्या प्रयत्नात होते आणि तेवढ्यात त्यांनी पाण्यात उडी घेतल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अनेकांना जिनिचेव यांनी जाणीवपूर्वक पाण्यात उडी मारली, असं वाटलं. मात्र प्रत्यक्षात त्यांचा पाय घसरल्यामुळे ते पाण्यात पडले आणि डोक्याला दगडाचा मार लागून त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा - अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्याची माहिती द्या आणि कमवा 50 लाख डॉलर: अमेरिका जिनिचेव हे 2018 पासून रशियाच्या आपातकालीन नियोजन सांभाळणाऱ्या मंत्रालयाचा कारभार पाहत होते. त्यापूर्वी ते केजीबीमध्ये सेवा देत होते. एक जुने आणि जाणते नेते म्हणून जिनिचेव यांची ओळख होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Accident, Death, Russia

    पुढील बातम्या