माॅस्को, 16 ऑगस्ट : जर कोणी व्यक्ती व्यवस्थित झोप घेत नसेल तर त्याला अनेक आजारांची लागण होऊ शकते. अनेकदा कोणी व्यक्ती 24 तासांपेक्षा अधिक वेळेपर्यंत झोपला नसेल तर त्याला डोकेदुखीसारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही विचार केला आहे की जर कोणी व्यक्ती (Human) एक दोन दिवस नाही तर एक महिन्यांपर्यंत झोपला नाही तर त्याच्यासोबत काय होईल? तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या व्यवहारात बदल होईल. अद्याप याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही.
मात्र दुसऱ्या विश्वयुद्धाच्यापूर्वी असा प्रयोग झाला होता. ज्यामध्ये रशियाच्या वैज्ञानिकांनी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. सांगितले जात आहे की 1940 च्या दशकाच्या शेवटी रशियाच्या संशोधकांनी एक प्रयोगात्मक गॅस आधारित उत्तेजकाचा उपयोग करीत 15 दिवसांपर्यंत 5 लोकांना जागं ठेवलं होतं. या लोकांना अशा खोलीत ठेवण्यात आलं होतं जे पूर्णपणे सील होतं आणि यादरम्यान त्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सीजनचा उपयोगही सावधानीपूर्वक निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता. या खोल्यांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली होती आणि पुरेसं कोरडं अन्न, वाहतं पाणी आणि टॉयलेटची सुविधा होती. पाच इंचाची मोठी काचेची खिडकी होती, ज्यातून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. सांगितले जात आहे की जे लोक परीक्षण करण्यासाठी आणण्यात आले होते ते राजकीय कैदी होते.
ज्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान देशाचा शत्रू मानलं गेलं होतं. त्यांना खोटं वचन देण्यात आलं होतं की प्रयोगानंतर त्यांना सोडण्यात येईल. अशात लोक तयार झाले होते. या प्रयोगातील पहिले पाच दिवस सर्वकाही ठीक होतं. सुरुवातीला सर्वजण आपल्या भूतकाळात घडलेल्या दु:खद गोष्टींविषयी बोलत होते. यानंतर गोष्टी बदलू लागल्या. यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. त्यानंतर ते मायक्रोफोनमध्ये काहीतरी बडबड करीत...त्यानंतर खिडकीच्या कांचाजवळ जाऊन चित्रविचित्र हावभाव करीत होते. त्यानंतर 11व्या दिवसांपर्यंत अनेक विचित्र गोष्टी त्या चेंबरमध्ये घडत होत्या.
त्यातील एक व्यक्ती तब्बल 3 तास चेंबरमध्ये आरडाओरड करीत होता आणि त्यानंतर अचानक थांबला. काहींना वाटले की ओरडल्यामुळे त्याच्या व्होकल कॉडला दुखापत झाली असावी. त्यानंतर 14 व्या दिवशी प्रयोग समाप्त झाल्यानंतर त्यांना चेंबर बाहेर येण्याचं आवाहन करण्यात आलं मात्र त्यांनी याला नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चेंबर खोलण्याचा निर्णय घेतला. यावेळी जे रशियन पोलिसांनी पाहिलं ते हादरवणारं होतं. यातील पाच जणांपैकी एकाची बॉडी जमिनीवर पडली होती आणि उरलेल्या चौघांच्या शरीरावर मांसचं दिसत नव्हते. त्यांनी स्वत:च्याच शरीराचं मांस खाल्ल्याची माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia