मॉस्को, 28 ऑक्टोबर : रशियामधील मॉडेल (russian model) तिच्या घरात मृतावस्थेत सापडली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेच्या हाताचा अंगठा कापण्यात आला आहे. महिलेची हत्या (murder) करून तिचा अंगठा घेऊन आरोपी फरार झाला. त्याने तिचा मोबाईल नेला आणि तो मोबाईल अनलॉक करण्यासाठी तिचा अंगठा नेल्याचं सांगितलं जातं आहे.
34 एकातेरिना एंटोंटसेवा (Ekaterina Antontseva) एक शास्त्रज्ञ आणि मॉडेल होती. सेंट पीटर्सबर्ग टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युटमध्ये बायोकेमिस्ट होती. पार्ट टाइम म्हमून ती मॉडेलिंगचंही काम करायची. जेव्हा तिचा बॉयफ्रेंड प्रवासाहून घरी परतला तेव्हा ती घरी मृतावस्थेत दिसली. तिचा मृतदेह नग्नावस्थेत तिच्या घरात सापडला. शिवाय तिच्या हाताचा एक अंगठाही नव्हता. तो कापून नेला होता.
द सनच्या रिपोर्टनुसार या हत्येप्रकरणी सोमवारी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्याचं नाव एर्टोम नाव. तो 36 वर्षांचा असून एक कॉम्प्युटर गेमर असल्याचं सांगितलं जातं आहे. त्याच्या घरी एकातेरिनाचा अंगठा सापडला आहे. त्याने एकातेरिनाचा मोबाइल खोलण्यासाठी तिचा अंगठा कापून नेल्याचा संशय आहे.
हे वाचा - YouTube वर क्राईम व्हिडीओ पाहून रचला डाव; मायलेकानं काढला वडिलांचा काटा
आरोपीने तिच्या मोबाईलचा वापर करून आपण आजारी आहोत, कामावर येऊ शकत नाही असे मेसेज करण्यासाठी तसंच तिच्या मोबाईलमधील आपले मेसेज डिलीट करण्यासाठी केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, त्याने पैशांसाठी ही हत्या केली असावी.
हे वाचा - रस्त्यावर का थुंकतोस म्हणून विचारला जाब; रागात त्याने चाकूनंच भोसकलं
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृत्यू झाला आहे हे कुणाला समजू नये, यासाठी त्याने सर्व व्यवस्था केली. त्यानं तिच्या घराच्या खिडक्या-दरवाजे बंद करून घेतले. ते सील केले. जेणेकरून मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंध घराबाहेर पडू नये.