Home /News /videsh /

VIDEO: दोन नि:शस्त्र युक्रेनियन नागरिकांची निर्घृण हत्या; रशियन सैनिकांचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद

VIDEO: दोन नि:शस्त्र युक्रेनियन नागरिकांची निर्घृण हत्या; रशियन सैनिकांचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद

युद्धाच्या काळात नि:शस्त्र नागरिकांना लक्ष्य करणं बेकायदेशीर आहे, असा नियम आहे. तरीदेखील रशियन सैनिकांनी निर्दयीपणे गोळीबार करून दोन युक्रेनियन नागरिकांचा जीव घेतला.

    कीव 12 मे : युक्रेन आणि रशियातील (Russia Ukraine War) संघर्ष शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. रशियानं युक्रेनमधील राजधानीचं शहर कीव आणि मारियुपोल शहरांमध्ये विद्ध्वंस केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन बॉम्बहल्ल्यात मारियुपोलमधील 80 टक्क्यांपेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होऊन आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीदेखील कुणीही माघार घेण्यास तयार नाही. दरम्यान, रशियन सैन्याच्या (Russian Soldiers) अमानवीयपणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही रशियन सैनिकांनी युक्रेनियन महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत तर काहींनी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचे जीव घेतले आहेत. आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. कीवच्या (Kyiv) बाहेरील भागात (Encounter) रशियन सैनिकांनी दोन नि:शस्त्र नागरिकांची (Unarmed Civilians) गोळ्या घालून हत्या (Killing) केली आहे. या घटनेचा सर्व्हिलन्स व्हिडिओ (Surveillance Video) सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युक्रेनियन प्रॉसिक्युटर्स (Ukrainian Prosecutors) या प्रकरणाचा 'वॉर क्राईम' म्हणून तपास करत आहेत. सीएनएननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध; पोलंडमधील संतप्त लोकांनी रशियन राजदूतावर फेकला लाल रंग मार्च महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा रशियन सैन्यानं कीवमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा कीवमधील सिक्युरिटी कॅमेऱ्यांमध्ये या कारवाईचं चित्रीकरण झालं होतं. अगदी त्याच पद्धतीनं 16 मार्च रोजी कार डीलरशिप शॉपच्या (Car Dealership Shop) बाहेर घडलेली एक अमानुष घटनाही चित्रित झाली आहे. कार शॉपच्या बाहेर घडलेल्या घटनेत सशस्त्र रशियन सैनिकांनी दोन नि:शस्त्र युक्रेनियन नागरिकांची हत्या केली होती. नागरिकांच्या हत्येच्या या व्हिडिओच्या खरेपणाची सीएनएननं पडताळणी केली आहे. कार शॉपच्या बाहेरील बाजूला लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये हा व्हिडिओ शूट झालेला असून, त्याचा आवाज ऐकू येत नाही. मात्र, त्याची क्लॅरिटी अतिशय चांगली आहे. त्यातून रशियन सैनिकांचा हिंस्रपणा स्पष्टपणे दिसत आहे. युद्धाच्या काळात नि:शस्त्र नागरिकांना लक्ष्य करणं बेकायदेशीर आहे, असा नियम आहे. तरीदेखील रशियन सैनिकांनी निर्दयीपणे गोळीबार करून दोन युक्रेनियन नागरिकांचा जीव घेतला. सीएनएननं या मृत नागरिकांची ओळख पटवली आहे. यातील एक व्यक्ती रशियन सैनिकांनी लुटलेल्या कार डीलरशिप शॉपची मालक होती. तिच्या कुटुंबियांनी नाव सांगण्यास नकार दिला आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिओनिड ओलेक्सिओविच प्लायट्स (Leonid Oleksiyovych Plyats) असं होतं. 68 वर्षीय प्लायट्स तिथे गार्ड म्हणून काम करत होते. Russia Ukraine War : रशिया क्षेपणास्त्र दहशतवाद करत असल्याचा युक्रेनचा आरोप, झेलेन्स्की म्हणाले.. कॅमेऱ्यामध्ये शूट झालेल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा या दोन व्यक्ती रशियन सैनिकांशी बोलून परत जाताना दिसतात. त्याचवेळी रशियन सैनिक पाठीमागून या दोघांवर बंदुकीतून गोळ्या झाडतात आणि ते दोघं जमिनीवर कोसळतात असं दिसत आहे. प्लायट्स यांची जीव वाचवण्याची हृदयद्रावक धडपडही दिसत आहे. गोळ्या लागल्यानंतरही त्यांनी आपल्या केबिनमध्ये जाऊन युक्रेनियन सैन्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सैनिक त्या ठिकाणी पोहचेपर्यंत प्लायट्स रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 'रशियन सैनिक अतिशय क्रूर (Cruel) आहेत. त्यांची वर्तणूक भयंकर आहे. माझे वडील एक साधे नि:शस्त्र नागरिक होते. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात (International Court) जावं, अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे, केवळ युक्रेनच नाही तर संपूर्ण जगाला रशियाचा खरा चेहरा दिसेल. माझ्या वडिलांच्या हत्येचा व्हिडिओ पाहण्याची माझी हिंमत होत नाही. पण, माझ्या मुलांना मी हा व्हिडिओ नक्की दाखवेल जणेकरून त्यांना क्रूर आक्रमकांचा (Invaders) खरा चेहरा दिसेल,' अशी संतप्त प्रतिक्रिया प्लायट्स यांची मुलगी युलियानं दिली आहे. सीएनएननं मिळवलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रकरणाची 'वॉर क्राईम'म्हणून चौकशी सुरू झाली आहे, अशी माहिती युक्रेनच्या एका टॉप प्रॉसिक्युटरनं दिली आहे. रशियन सैनिकांच्या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सीएनएननं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची (Russia's Defense Ministry) प्रतिक्रिया मागितली होती. परंतु, रशियानं अद्याप कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळं मानवतावादी विचारसरणीच्या लोकांनी रशियावर जोरदार टीका सुरू केली आहे.
    First published:

    Tags: Murder, Russia Ukraine

    पुढील बातम्या