रशियन विमानांनी युक्रेनमधील निवासी भागांवर टाकले बॉम्ब; चिमुकल्यांचाही मृत्यू, हृदयद्रावक VIDEO
रशियन विमानांनी युक्रेनमधील निवासी भागांवर टाकले बॉम्ब; चिमुकल्यांचाही मृत्यू, हृदयद्रावक VIDEO
युक्रेनमधील भीषण परिस्थिती दाखवणारे आणि रशियाच्या हल्ल्याचे व्हिडिओ सतत समोर येत आहेत. अशातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात रशियन विमानांनी सुमी येथील निवासी भागांवर बॉम्ब टाकल्याचं दिसतं.
कीव 08 मार्च : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात जवळपास मागील 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरू असून दोन्ही देशांमधील युद्धामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी देश सोडला आहे. युनायटेड नेशन्स निर्वासित एजन्सीनं म्हटलं आहे की आतापर्यंत 1.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी युद्धग्रस्त युक्रेन सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. मात्र काही लोक तिथेच अडकले आहेत. अशात आता रशियन विमानांनी सुमी येथील निवासी भागांवर बॉम्ब टाकले असल्याचं वृत्त समोर आलं आहे (Russian Planes Dropped Bombs on Residential Areas of Sumy)
युक्रेनमधील भीषण परिस्थिती दाखवणारे आणि रशियाच्या हल्ल्याचे व्हिडिओ सतत समोर येत आहेत. अशातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात रशियन विमानांनी सुमी येथील निवासी भागांवर बॉम्ब टाकल्याचं दिसतं. सुमी प्रादेशिक राज्य प्रशासनाचे प्रमुख, दिमित्रो झिवित्स्की यांनी सांगितलं की रशियन विमानांनी शहरातील निवासी भागांवर बॉम्ब टाकले आहेत. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
The head of the #Sumy Regional State Administration, Dmytro Zhyvitsky, reports that #Russian planes dropped bombs on residential areas of the city.
दरम्यान युक्रेन आणि रशियामधील युद्ध अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. क्रेमलिनच्या (Kremlin) प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं की, रशियाने युक्रेनला सांगितलं आहे की कीवने अटींची यादी स्वीकारल्यास ते क्षणात आपले लष्करी ऑपरेशन थांबवण्यास तयार आहेत. युक्रेनमधील तथाकथित 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन' थांबवण्यासाठी रशियाने काही अटी ठेवल्या आहे. यात युक्रेनने लष्करी कारवाई थांबवावी, तटस्थता प्रस्थापित करण्यासाठी युक्रेनने आपलं संविधान बदलावं, क्रिमियाला रशियाचा भाग मानावा आणि युक्रेनने दोनेस्तक आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश मानावं, या अटी ठेवण्यात आल्या आहेत. युक्रेनने या अटी मान्य केल्यास क्षणात हे युद्ध थांबवू असं रशियाने म्हटलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.