VIDEO : फक्त इनरवेअर घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सला पुन्हा मिळाली नोकरी!

VIDEO : फक्त इनरवेअर घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सला पुन्हा मिळाली नोकरी!

रशियाची 'टू हॉट नर्स' म्हणूनही ओळखलं जात आहे. रशियातील नर्स आणि तिच्या सहकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

  • Share this:

मॉस्को, 22 जून : एका रुग्णालयात नर्सनं इनर वेअरवर PPE कीट घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत असल्याचं समोर आलं होतं. रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका नर्सचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिला रशियाची 'टू हॉट नर्स' म्हणूनही ओळखलं जात आहे. रशियातील नर्स आणि तिच्या सहकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान अयोग्य कपड्यांच्या आरोपाखाली 23 वर्षीय नादियाला जुकोवा (Nadia Zhukova) रुग्णालयानं नोकरीवरून काढलं होतं. मात्र तिला आता फक्त दुसरी नोकरी मिळाली नाही तर एका मोठ्या स्पोर्ट्सवेअर ब्रँडचे मॉडेलिंग करण्याचे कंत्राटही मिळाले आहे, असे नादियाने सांगितले आहे.

द सन मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नादियाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रुग्णालयानं तिला निलंबित केले. मात्र रशियाच्या सर्व डॉक्टर आणि परिचारिकांशी संबंधित संस्थांनी नादियाच्या बाजूनं आवाज उठविला होता. नादियानं PPE सूट परिधान केल्यामुळे तिला खूप त्रास होत होता, श्वास घेता येत नव्हता, असे तिचे म्हणणे होते.

वाचा-अजब आंदोलन! जिम सुरू करण्यासाठी चक्क कपडे काढून रस्त्यावर उतरले तरुण आणि...

मिळाली दुसरी नोकरी

नादियानं RT शी बोलताना सांगितले की, लोकांची सेवा नेहमीच करायची आहे आणि म्हणूनच त्यांनी नर्सचा फिल्ड निवडले. पुन्हा काम मिळाल्यामुळं तिला खूप चांगले वाटत असल्याचं नादिया म्हणाली. प्राप्त माहितीनुसार नादियाचे वडील रशियाची गुप्तचर संस्था एफएसबीमध्येही काम करतात. नादियाच्या म्हणण्यानुसार, तिने त्या काळात रूग्णांना मदत करण्यासाठी फक्त इनरवेअरमध्ये काम केल्याची कबुली दिली होती.

वाचा-Shocking! स्वत:च्याच मुलामुळे गर्भवती झाली ही महिला

मॉडलिंग कॉन्ट्रॅक्टही मिळाले

रशियातील प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर ब्रँड झॅस्पोर्टने नादियाला मॉडेल म्हणून निवडले आहे. ही कंपनी एफएसबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलगी चालवते. या कंपनीच्या मालकानेही नादियाच्या समर्थनार्थ ऑनलाइन मोहीम राबविली होती. एका फोटोने एखाद्याचे आयुष्य कसे बदलू शकते हे आता तिला समजले आहे, असे नादियाने सांगितले.

नर्सनं ट्रोलर्सना दिलं चोख प्रत्युत्तर...

सतत पीपीई कीट घालून राहावं लागत असल्यानं उष्णतेमुळे असह्य होतं. त्यामुळे या नर्स आपला गाऊन काढून फक्त आतल्या कपड्यांवर पीपीई सूट चढवतात. याशिवाय अनेकदा सलग तीन तीन शिफ्टमध्ये काम करण्याची वेळही येते. मी माझे काम करीत होते आणि उष्णतेमुळे मला ते थांबवायचे नव्हते. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून रूग्णांची काळजी घेतो त्यांच्यावर उपचार करत असतो, जे लोक माझे कपडे पाहून मला ट्रोल करत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, असं नादियाचे म्हणणं होतं.

वाचा-डोंगराच्या टोकावर उभा राहून मारायला गेला बॅक फ्लिप आणि..., थरकाप उडवणारा VIDEO

First published: June 22, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या