Home /News /videsh /

पेट्रोल-डिझेलचे दर दुप्पट होणार? रशियाने युरोपला तेल पुरवठा बंद करण्याची दिली धमकी!

पेट्रोल-डिझेलचे दर दुप्पट होणार? रशियाने युरोपला तेल पुरवठा बंद करण्याची दिली धमकी!

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर कडक निर्बंध लादत आहेत. रशियाच्या उपपंतप्रधानांनी या निर्बंधांमुळे युरोपला गॅस पुरवठा कमी करण्याची धमकी दिली. सध्या रशिया तेल आणि वायूच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे.

    मॉस्को, 8 मार्च : युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारल्यापासून रशियाला (Russia) अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून कठोर आर्थिक निर्बंधांचा (US Sanctions) सामना करावा लागत आहे. स्विफ्टमधून (SWIFT) हद्दपार केल्यानंतर आणि अनेक बँकांवर निर्बंध लादल्यानंतर अमेरिकेने रशियन तेल आणि ग्रसवर (Russian Oil & Gas) बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर रशियाने सोमवारी तिखट प्रतिक्रिया देत युरोपला होणारा गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी दिली. यासोबतच रशियाने पाश्चिमात्य देशांना कच्च्या तेलाचा (Crude Oil) दर प्रति बॅरल 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो असा इशारा दिला आहे. रशियाच्या उपपंतप्रधानांनी दिली धमकी रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक (Alexander Novak) यांनी सरकारी टेलिव्हिजनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'हे पूर्णपणे स्पष्ट आहे की जर रशियन तेल नाकारले गेले तर त्याचे जागतिक बाजारावर गंभीर परिणाम होतील. कच्च्या तेलाच्या किमतीत एवढी वाढ होईल, ज्याचा अंदाज लावला येणार नाही. जास्त वाढले नाही तरी ते प्रति बॅरल 300 डॉलर इतका असेल. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच युक्रेनमध्ये लपवला येशू ख्रिस्ताचा पुतळा! अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांकडून टीका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (Antony Blinken) यांच्या नुकत्याच आलेल्या टीकेवर नोव्हाक प्रतिक्रिया देत होते. ब्लिंकेन म्हणाले की अमेरिका आणि त्याचे युरोपियन मित्र देश रशियन तेल आणि वायू आयातीवर निर्बंध लादण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या. त्यानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 140 च्या जवळ पोहोचली, जी 2008 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. रशियाने तेल आणि वायूवर घातलेल्या बंदीमुळे निर्माण झालेला गोंधळ थांबवण्यासाठी अमेरिका आणि मित्र देश इराणला पुन्हा बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी खोळंबलेल्या इराण अणुकराराचे पुनरुज्जीवन केले जात आहे. युरोपला वर्षभरातही भरपाई मिळणार नाही रशियन नेत्याने युरोपला लक्ष्य करताना म्हटले, की रशियाकडून मिळणारे तेल रिप्लेस करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ लागेल. यासोबतच युरोपला यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. युरोपियन नेत्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या लोकांना काय होईल ते सांगावे, जर तुम्हाला रशियाचा ऊर्जा पुरवठा थांबवायचा असेल तर तसे करा. यासाठी आम्ही तयार आहोत. असे झाल्यावर आमचे तेल कुठे विकायचे हे आम्हाला माहीत आहे. युद्धात जीव वाचवण्यासाठी 'या' 80 वर्षांच्या आजींनी केला सात तास पायी प्रवास जर्मनीच्या या निर्णयावर रशियाची नाराजी नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइनचे प्रमाणपत्र जर्मनीने गोठवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या युरोपच्या 40 टक्के गॅस गरजा पुरवणारा रशिया अजूनही आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु, जर्मनीच्या कारवाईनंतर रशियाला मागे हटण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते म्हणाले, 'नॉर्ड स्ट्रीम 2 वर बंदी घालण्याच्या बाबतीत नेमके तेच पाऊल उचलण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आम्ही नॉर्ड स्ट्रीम 1 गॅस पाइपलाइनमधून गॅस पुरवठा थांबवू शकतो. आतापर्यंत आम्ही हे केलं नाही. पण, युरोपातील नेत्यांनी केलेली वक्तव्ये आणि रशियावरचे आरोप यामुळे आम्हाला असा निर्णय घेण्याच्या जवळ आणले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या