मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: रशियाचा सर्वात मोठ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर हल्ला, संपूर्ण युरोप धोक्यात

Russia-Ukraine War: रशियाचा सर्वात मोठ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर हल्ला, संपूर्ण युरोप धोक्यात

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war)  युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war) युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war) युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे.

  • Published by:  Pooja Vichare
कीव, 04 मार्च: रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war) युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर (nuclear power plant) बॉम्बफेक करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा युक्रेनचा सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे, येथे 6 अणुभट्ट्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रशियन सैन्याची या शहराकडे वाटचाल सुरू होती. आता इथे जबरदस्त बॉम्बहल्ले सुरु आहेत. या हल्ल्यामुळे धोकादायक अपघाताचा इशारा देण्यात आला आहे. युक्रेनचे म्हणणं आहे की, प्लांटमधून धूर निघताना दिसत आहे. रशियानं युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट (Zaporizhzhia Oblast) प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन अधिकार्‍यांचा दावा आहे की हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत आहेत. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनं युक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने मोठी बातमी दिली आहे. युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून (Zaporizhzhia Nuclear Power Plant)धूर निघताना दिसत आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आगीनंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ले मागे घेण्याचे आवाहन रशियन सैन्याला केलं आहे. कुलेबा यांनी ट्विट केलं की, जर तो स्फोट झाला तर तो चोरनोबिलपेक्षा 10 पट मोठा स्फोट असेल! रशियन लोकांनी आग त्वरित थांबवली पाहिजे. रशियानं युक्रेनमधील एनरहोदर शहरावर हल्ला केला आहे. एनरहोदर हे युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्टच्या उत्तर-पश्चिम भागातील एक शहर आणि नगरपालिका आहे. एनरहोदर झापोरिझ्झियापासून काही अंतरावर आहे. एनरहोदर (Enerhodar) निकोपोल (Nikopol) आणि चेर्वोनोह्रीहोरिव्हका (Chervonohryhorivka) समोर, काखोव्का ( Kakhovka) जलाशयाजवळ नीपर नदीच्या डाव्या तीरावर स्थित आहे. युक्रेनमधील झापोरिझ्झिया न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये 6 अणुभट्ट्या आहेत, जे संपूर्ण युरोपमधील सर्वात मोठे आणि पृथ्वीवरील 9व्या क्रमांकाचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया सध्या मोर्टार आणि आरपीजीने हल्ला करत आहे. ऊर्जा केंद्राच्या काही भागांना सध्या आग लागली आहे. रशियन लोकांनी अग्निशमन दलावरही गोळीबार करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेनमधील लढत निर्णायक वळणावर पोहोचताना दिसत नाही. या युद्धात पुन्हा अणुयुद्धाचा धोका वाढला आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रे रशियाच्या लक्ष्यावर आहेत. यापूर्वी 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्यानं चेर्नोबिल अणु प्रकल्प (Chernobyl Nuclear Plant) ताब्यात घेतला होता. अमेरिकेसह पाश्चिमात्य देश युक्रेनला मदत करत आहेत आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आधीच इशारा दिला आहे की, बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप केल्यास असे परिणाम भोगावे लागतील जे यापूर्वी कधीही दिसले नाहीत. तज्ज्ञ मंडळी पुतीन यांच्या या धमकीला अणुयुद्धाशी जोडून पाहत आहेत. इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबोलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) नुसार, जर अमेरिका आणि रशिया यांच्यात अणुयुद्ध सुरू झाले तर मृतांचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या