Home /News /videsh /

युद्धाचा 52 वा दिवस; युक्रेनचं पहिलं मोठं शहर रशियाच्या ताब्यात, खार्किवसह आठ शहरांमध्ये बॉम्बचा धुमाकूळ

युद्धाचा 52 वा दिवस; युक्रेनचं पहिलं मोठं शहर रशियाच्या ताब्यात, खार्किवसह आठ शहरांमध्ये बॉम्बचा धुमाकूळ

Russia-Ukraine War

Russia-Ukraine War

Russia Ukraine War: युद्ध सुरू झाल्यापासून येथून सातत्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू होतं, आता शहरात केवळ एक लाख नागरिक उरले आहेत.

    कीव, 17 एप्रिल: दीड महिन्यांहून अधिक काळ लढल्यानंतर, रशियन सैन्याने (Russian forces) शेवटी मारीपोल (Mariupol) शहर ताब्यात घेतलं आहे. रशियन सैन्यानं म्हटलं आहे की, मारीपोल आणि त्याच्या आसपासच्या भागात किरकोळ लढाईची परिस्थिती आता फक्त अजोवस्टाल स्टील कारखान्यात आहे, ती देखील लवकरच शांत होईल. रशियन सैन्याने मारीपोल ताब्यात घेतला सुमारे साडे चार लाख लोकसंख्या असलेले मारीपोल हे रशियन सैन्यानं ताब्यात घेतलेलं युक्रेनमधील पहिलं मोठे शहर आहे. युद्ध सुरू झाल्यापासून येथून सातत्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू होतं, आता शहरात केवळ एक लाख नागरिक उरले आहेत. रशियाची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे युक्रेनची राजधानी कीवसह संपूर्ण भागात कहर करत आहेत. शनिवारी खार्किव या दुसऱ्या मोठ्या शहरासह आठ शहरांवर बॉम्ब, गोळीबार आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. मोठ्या संख्येने लोक विस्थापित खार्किवमध्ये गेल्या 24 तासांत रशियाच्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर मीकोलईवमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 39 जण जखमी झाले आहेत. रशियन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात राजधानी कीवजवळील डार्निटस्की येथील टँक दुरुस्तीचा कारखाना आगीत नष्ट झाला आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रशियाने मीकोलईवमधील लष्करी वाहनांची दुरुस्ती करणारा कारखाना नष्ट झाला असल्याचं सांगितलं आहे. युद्धनौका बुडल्यानंतर हल्ले वाढले काळ्या समुद्रात मस्कावा ही युद्धनौका बुडाल्यानंतर रशियन सैन्याने हल्ल्यांच्या श्रेणीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. रशियन सैन्य पुन्हा एकदा संपूर्ण युक्रेनवर हल्ले करत आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात रशियाची युद्धनौका बुडाल्याचे युक्रेन आणि अमेरिकेनं म्हटलं आहे. रशियन ताब्यापूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मारीपोलमधील परिस्थिती अतिशय कठीण असल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले, तिथे सैनिकांनी घेरलं आहे, जखमी आणि भुकेल्या-आजारांपर्यंत कोणतीही मदत पोहोचत नाही. वेढलेले लोक स्वतःचा बचाव करत आहेत. ही एक गंभीर मानवी शोकांतिका आहे. रशियन सैन्याने हवाई पट्टी नष्ट केली रशियाच्या लष्कराने क्षेपणास्त्र हल्ला करून युक्रेनच्या ओलेक्झांड्रिया भागात स्थित हवाई पट्टी उद्ध्वस्त केली आहे. ही पट्टी अनेकदा लष्करी विमानांसाठी वापरली जात असे. दुसर्‍या विकासात, युक्रेनियन सैन्याने सांगितले की, बेलारूसहून उड्डाण घेतल्यानंतर रशियन लढाऊ विमानांनी पोलँड सीमेजवळील ल्विव्ह भागात चार क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, मात्र ते हवाई संरक्षण प्रणालीद्वारे नष्ट केले गेले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या