मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-ukraine War: अमेरिकेतील 9/11 हल्ल्याची युक्रेननं करुन दिली आठवण, शेअर केला 'तो' फोटो

Russia-ukraine War: अमेरिकेतील 9/11 हल्ल्याची युक्रेननं करुन दिली आठवण, शेअर केला 'तो' फोटो

Russia-ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे.

Russia-ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे.

Russia-ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे.

    कीव, 27 फेब्रुवारी: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. दरम्यान, कीवमधील इमारतीवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयानं सोशल मीडियावर अमेरिकेचा 9/11 हल्ला आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यांची तुलना करणारे फोटो शेअर केले आहेत. फोटोत अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (World Trade Centre) ट्विन टॉवर्सवर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर निघलेला धूर दिसत आहे. तसंच फोटोत कीवमधील रशियन हल्ल्यादरम्यान, क्षेपणास्त्राचा हल्ला (Missile Attack)झाल्यानंतर एक कोसळताना इमारत दिसत आहे. कीवमधील इमारतीवर झालेल्या रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याची तुलना 9/11 शी युक्रेननं कीवमधील (Kyiv) इमारतीवरील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11शी केली आहे. त्याचबरोबर युक्रेननं जगातील सर्व देशांना रशियाच्या राजदूतांना त्यांच्या देशातून काढून टाकण्यास सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया युक्रेनमध्ये हल्ले करत असून आगामी काळात क्षेपणास्त्र हल्ल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील सामान्य लोकही रशियन हल्ल्याचे बळी ठरले आहेत. याशिवाय रशिया युक्रेनचे अनेक लष्करी तळ नष्ट करण्याचा दावा करत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असोसिएटेड प्रेसच्या मते, रशियाच्या सैन्यानं शनिवारी सांगितलं की, त्यांनी युक्रेनच्या लष्करी तळांवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी (Cruise Missiles) हल्ला केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह (Maj Gen Igor Konashenkov) यांनी शनिवारी सांगितलं की, अनेक युक्रेनियन लष्करी प्रतिष्ठानांवर लष्करानं लांब पल्ल्याच्या कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रांनी (Kalibr Cruise Missiles) हल्ला केला. गुरुवारी रशियाचा हल्ला सुरू झाल्यापासून लष्करानं युक्रेनमधील 821 लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. 14 विमानतळ आणि 19 लष्करी कमांड सेंटरसह लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यासह 24 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींसह अनेक ड्रोन आणि रणगाडे नष्ट करण्यात आले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या