Home /News /videsh /

रंगमंचावरच प्रयोग सुरू असतानाच आला मृत्यू; प्रेक्षकांना वाटला नाटकाचाच भाग!

रंगमंचावरच प्रयोग सुरू असतानाच आला मृत्यू; प्रेक्षकांना वाटला नाटकाचाच भाग!

रंगमंचावर घडलेल्या अपघातात एका तरुण कलाकाराला आपला जीव हकनाक गमवावा लागला. याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

मॉस्को, 11 ऑक्टोबर : अभिनय ही अशी कला (Art) आहे, जी लोकांना भान विसरायला लावते. अनेक कलाकार या कलेने इतके झपाटलेले असतात की प्रत्येक भूमिका स्वतः जगत असतात. प्रेक्षकांना कधीही जाणवत नाही हा कलाकार अभिनय करत आहे. अशा कलाकारांचा अभिनय प्रत्यक्ष रंगमंचावर पाहणे ही एक निराळीच अनुभूती असते. त्यामुळे रंगमंचावरील नाट्यप्रयोगांची जादू आज हजारो वर्षानंतरही कायम आहे. आता आधुनिक काळात कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रपट, टीव्हीच्या पडद्याद्वारे निरनिराळे कलाविष्कार प्रेक्षकांसमोर येत असले तरी, रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगांना आजही पसंती मिळते. अनेक कलाकारांसाठी रंगमंच हेच त्यांचे आयुष्य असते. त्यामुळे एखाद्या कलाकाराला रंगमंचावर मरण आले तर भाग्यवान समजले जाते. मात्र काही वेळा रंगमंचावर नाट्य प्रयोग सादर करत असताना एखादा कलाकार कोसळला तर लोकांचा असा समज होतो की तो अभिनयच आहे. यामुळे काही कलाकारांना उपचार मिळण्यास उशीर झाल्याने जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच रशियातही (Russia) अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंगमंचावर घडलेल्या अपघातात एका तरुण कलाकाराला आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे. युरोपियन देशात प्राचीन काळापासून रंगमंचावर सांगीतिक नाट्यप्रयोग सादर केले जातात. त्याला ऑपेरा (Opera) असं म्हटलं जातं. अत्यंत प्राचीन नाट्यप्रकार म्हणून ऑपेरा जगभरात प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्षे तिथं ऑपेराचे प्रयोग चालतात. त्यासाठी काही संस्था प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक प्रसिद्ध संस्था असलेल्या रशियातील (Russia) बोल्शोई थिएटरचा 38 वर्षीय उमदा कलाकार (Theatre Artist) येवगेनी कुलेश (Yevgeny Kulesh) याचा मॉस्को (Moscow) इथे रंगमंचावरील एका प्रयोगादरम्यान अपघाती मृत्यू झाला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केला तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथमधील घटना रशियन संगीतकार (Musician) निकोलाई रिम्स्की-कोर्साकोव्ह यांचा 19 व्या शतकातील प्रसिद्ध ऑपेरा सदकोच्या (opera Sadko) सादरीकरणा दरम्यान ही घटना घडली. सेट (Set) बदलादरम्यान ही घटना घडली. सोशल मीडियावर शनिवारी घडलेल्या या घटनेच्या काही क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यानुसार, यात रंगमंचावर सेट बदलताना एक मोठा प्रोप सोडला जात असल्याचे दिसत असून, कुलेश या प्रोपखाली दबला जात असल्याचे दिसते. हे बघून त्याचे सहकारी कलाकार आरडाओरडा करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एक डॉक्टर जखमी येवगेनी कुलेशला पाहण्यासाठी तिथं पोहोचले; पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

शेजारच्या खोलीतून येत होते विचित्र आवाज; दरवाजा उघडताच ते दृश्य पाहून कुटुंबाला बसला धक्का

 या घटनेनंतर पडदा पाडण्यात आला आणि नाट्यप्रयोग रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं, मात्र हे सांगेपर्यंत प्रेक्षकांना रंगमंचावर घडत असलेला प्रकार म्हणजे नाटकाचा भाग असल्याचे वाटत होते.
या घटनेच्या चौकशीसाठी तपास समिती स्थापन करण्यात आली असून,बोल्शेई थिएटरच्या (Bolshoi Theatre) माजी अभिनेत्यांनी काम करण्याच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्षाबाबत निषेध केला आहे. एखादा कलाकार अशा पद्धतीने रंगमंचावर अपघात होऊन हकनाक मरण पावतो हे अत्यंत दुर्दैवी असून, हा सगळा संस्थेचा हलगर्जीपणा आहे, असं या कलाकारांनी म्हटलं आहे.
First published:

पुढील बातम्या