मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आजच्या घडीला जगातील बलाढ्य नेता असणारे पुतिन घाबरत होते या युक्रेनियन महिलेला; रशियाला दिलं होतं खुलं आव्हान

आजच्या घडीला जगातील बलाढ्य नेता असणारे पुतिन घाबरत होते या युक्रेनियन महिलेला; रशियाला दिलं होतं खुलं आव्हान

युलिया या युक्रेनमध्ये 'गॅस क्वीन' (Gas Queen Yulia Tymoshenko) या नावानं प्रसिद्ध होत्या. त्या नॅचरल गॅसचा उद्योग सांभाळत होत्या. युक्रेनमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमनमध्ये त्यांचा समावेश होता

युलिया या युक्रेनमध्ये 'गॅस क्वीन' (Gas Queen Yulia Tymoshenko) या नावानं प्रसिद्ध होत्या. त्या नॅचरल गॅसचा उद्योग सांभाळत होत्या. युक्रेनमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमनमध्ये त्यांचा समावेश होता

युलिया या युक्रेनमध्ये 'गॅस क्वीन' (Gas Queen Yulia Tymoshenko) या नावानं प्रसिद्ध होत्या. त्या नॅचरल गॅसचा उद्योग सांभाळत होत्या. युक्रेनमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमनमध्ये त्यांचा समावेश होता

कीव, 25 फेब्रुवारी: रशियानं युक्रेनवर आक्रमण (Russia Attack on Ukraine) केलं आहे. गुरुवार ते शुक्रवार दरम्यान रशियानं युक्रेनवर 203 हल्ले केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यांच्या संदर्भात रशियानं दावा केला आहे की, त्यांनी युक्रेनमधील 70हून अधिक महत्त्वाचे तळ नष्ट केले आहेत. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) जगभरात तणाव वाढत आहे. अमेरिका (US), ब्रिटन (Britain) यासारखी बलाढ्य राष्ट्रं आणि युरोपियन युनियननं (European Union) रशियावर आर्थिक निर्बंध (Economic Restrictions) लादले आहेत. तरीदेखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी माघार न घेता युक्रेनवरील आक्रमणाची कारवाई सुरूच ठेवली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला पुतिन यांना जगातील सर्वांत शक्तिशाली राजकीय नेता मानलं जातं आहे. युक्रेनला पूर्णपणे नष्ट करण्याचा पुतिन यांचा मानस असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान हेच पुतिन कधीकाळी एका युक्रेनियन महिलेला घाबरत होते, असं सांगितल्यास कुणालाही विश्वास बसणार नाही. युलिया तायमोशेन्को (Yulia Tymoshenko) असं या महिलेचं नाव होतं. झी न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा-युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा Emotional Video..! म्हणाले,'मी आणि माझी पत्नी...' युलिया या युक्रेनमध्ये 'गॅस क्वीन' (Gas Queen Yulia Tymoshenko) या नावानं प्रसिद्ध होत्या. त्या नॅचरल गॅसचा उद्योग सांभाळत होत्या. युक्रेनमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमनमध्ये त्यांचा समावेश होता. पुढे त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्या युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 2005 मध्ये काही महिने आणि नंतर 2007 ते 2010 पर्यंतच्या काळात त्या युक्रेनच्या पंतप्रधान होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी उघडपणे रशिया आणि पुतिन यांना विरोध केला होता. त्यांनी रशियाला अनेकवेळा खुलं आव्हानही दिलं होतं. आपल्या देशाची एक इंच जमिनही रशियाच्या हाती लागू देणार नाही. मग, त्यासाठी युद्ध करावं लागलं तरी चालेल, असा पवित्रा युलिया यांनी घेतला होता. युक्रेनमध्ये युलिया यांची सत्ता असताना रशिया मात्र, नेहमीच दोन पावलं मागे होता. हे वाचा-युक्रेनमध्ये सायकलस्वारावर तोफगोळा पडतानाचा थेट Live Video 2005 मध्ये, जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगेझिननं जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत युलिया तायमोशेन्को यांना तिसरं स्थान दिलं होतं. युलिया या केवळ युक्रेनच्याच नव्हे तर पूर्वीच्या सोव्हिएत युनियन देशांतील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध ठेवले होते. युक्रेनचा नाटोमध्ये (NATO) समावेश व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. 2010मध्ये त्यांनी राष्ट्रापतिपदाची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द संकटात आली. युलिया पंतप्रधान असताना, रशिया समर्थक असलेल्या राष्ट्रपती व्हिक्टर युश्न्कोव्ह यांनी त्यांना तुरुंगात पाठवलं होतं. रशियाबरोबरच्या गॅस करारात भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवून त्यांचा छळ करण्यात आला. 2011 ते 2014 या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला. या क्षणी आक्रमक असलेल्या रशियाच्या धमक्यांना युलिया भीकदेखील घालत नव्हत्या. त्यामुळे संकटात असलेल्या युक्रेनियन (Ukrainian) नागरिकांना आपल्या महिला पंतप्रधानांची आठवण येत आहे. त्यांच्या मते, जर आज देशाची सत्ता युलिया तायमोशेन्को यांच्या हाती असती तर परिस्थिती नक्कीच वेगळी असती.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin

पुढील बातम्या