Home /News /videsh /

Russia-Ukraine War: युक्रेन लष्कराकडून 3 हजार भारतीय ओलीस?, पुतीन यांचा दावा खरा की खोटा?

Russia-Ukraine War: युक्रेन लष्कराकडून 3 हजार भारतीय ओलीस?, पुतीन यांचा दावा खरा की खोटा?

Russia-Ukraine War: सध्या युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले असून, त्यांना त्यांच्या मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा (Operation Ganga) मोहीम सुरू केली आहे.

    कीव, 04 मार्च: युक्रेन आणि रशिया (Ukraine and Russia) यांच्यात युद्ध (War) सुरूच आहे. सध्या युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले असून, त्यांना त्यांच्या मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा (Operation Ganga) मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. युक्रेनमध्ये 3,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवण्यात आल्याचा दावा पुतिन यांनी केला. एवढंच नाही तर पुतिन पुढे म्हणाले की, चिनी विद्यार्थ्यांनाही ओलीस ठेवले जात आहे. युक्रेन परदेशी लोकांना बाहेर काढण्यास विलंब करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांना धोका निर्माण करत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर पुतिन यांनी ही माहिती दिली. युक्रेनहून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, अर्ध्या रस्त्यातूनच नेलं कीवला पुतिन यांनी युक्रेनवर परदेशी नागरिकांना ढाल बनवत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आमचे लष्कर नागरिकांना तेथून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. चिनी नागरिकांनाही ओलीस ठेवण्यात आले होते, ज्यांची रशियन सैन्यानं सुटका केली आहे. रशिया युक्रेनमधील निवासी भागात कोणतीही लष्करी कारवाई करत नसल्याचंही पुतीन म्हणाले. पुतिन यांनी दावा केला आहे की, युक्रेनचे सैन्य परदेशी लोकांना युक्रेन सोडू देत नाही. युक्रेनमधून परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियन सैन्यानं मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. पुतीन म्हणाले की, युक्रेन परदेशी लोकांना बाहेर काढण्यास विलंब करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना धमकावत आहे. त्याच वेळी युक्रेन डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील लोकसंख्येला अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक भारतीय विद्यार्थी अजूनही खार्किवमध्ये अडकले त्याच वेळी, भारत सरकारने युक्रेनचे खार्किव शहर तात्काळ सोडण्याचा सल्ला दिल्याच्या एका दिवसानंतर, तेथे अडकलेले अनेक विद्यार्थी युद्धग्रस्त पूर्व युक्रेनमधून सुरक्षित भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. IND vs SL : रोहित शर्मानं टॉस जिंकला, पाहा कुणी घेतली Playing11 मध्ये पुजारा आणि अजिंक्यची जागा  खार्किवमधील युद्ध तीव्र होत असताना, भारताने बुधवारी आपल्या लोकांना पायी प्रवास करावा लागला तरी ते ताबडतोब शहर सोडण्यास सांगितलं. त्याच वेळी, रशियानं संघर्ष क्षेत्रातून भारतीयांच्या बाहेर पडण्याच्या संदर्भात 'मानवतावादी कॉरिडॉर' तयार करण्याचे आश्वासन दिलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या