Home /News /videsh /

Russia-Ukraine War Updates: काळ्या समुद्रात रशियन जबरदस्त फटाका, युक्रेनच्या हल्ल्यात Warship उद्धवस्त

Russia-Ukraine War Updates: काळ्या समुद्रात रशियन जबरदस्त फटाका, युक्रेनच्या हल्ल्यात Warship उद्धवस्त

Russia- Ukarain War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शेजारच्या युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 50 दिवसांनी रशियन सैन्याला मोठा धक्का बसला आहे.

    मॉस्को, 15 एप्रिल: रशियन (Russian) नौदलाची एक महत्त्वाची युद्धनौका (warship) काळ्या समुद्रात (Black Sea) बुडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शेजारच्या युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 50 दिवसांनी रशियन सैन्याला मोठा धक्का बसला आहे. एवढेच नाही तर याला रशियाचा प्रतिकात्मक पराभवही म्हटलं जात आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन बॅटल फ्लीटला गुरुवारी मोठं नुकसान झालं जेव्हा एका युद्धनौकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सर्व क्रू सदस्यांना सुरक्षितपणे उतरावे लागले. युद्धनौका बुडाली, रशियानंही स्वीकारलं रशियन राज्य वृत्त एजन्सी TASS नं गुरुवारी संध्याकाळी रशियन संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देऊन वृत्त दिलं की, मार्गदर्शित क्षेपणास्त्र क्रूझर मोस्कवा बुडालं आहे. रशियन निवेदनात म्हटलं आहे की, क्रूझर मोस्कवाला त्याच्या गंतव्य बंदरात घेऊन जात असताना दारूगोळ्याचा स्फोट झाला. ज्यामुळे जहाजावरील नियंत्रण सुटलं. समुद्रात वादळी परिस्थितीमुळे जहाज नंतर बुडालं. याआधी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांच्या लष्करानं युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. मात्र रशियाचे म्हणणं आहे की, मोस्कवा या युद्धनौकेचे आगीमुळे नुकसान झाले आहे, मात्र त्यावर कोणताही हल्ला झाला नाही. युक्रेनच्या दक्षिणी लष्करी कमांडने बुधवारी उशिरा दावा केला की, त्यांनी नेपच्यून अँटी-शिप क्षेपणास्त्रांसह रशियन युद्धनौका मोस्कवा नष्ट केली. हल्ल्यानंतर ते बुडू लागले आणि क्रूला जहाज सोडण्यास भाग पाडले गेले. मात्र, रशियाने यापूर्वीच युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा इन्कार केला आहे. युद्धनौकेला आग कशी लागली याचा तपास केला जाईल, असं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनच्या सर्व भागात एकाच वेळी हवाई हल्ल्याचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. कीव इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी कीवमध्ये शुक्रवारी सकाळी स्फोट झाल्याची माहिती मिळाली. एकापाठोपाठ एक 3 स्फोट झाले आहेत. रशियाचा प्रतीकात्मक पराभव पेंटागॉनच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, युद्धनौका ओडेसापासून सुमारे 60-65 नॉटिकल मैल अंतरावर होती, जेव्हा तिला आग लागली आणि काही तासांनंतरही आग आटोक्यात आली. युद्धनौकेचे नुकसान हा रशियन सैन्यासाठी मोठा धक्का आहे. राजधानी कीवसह देशाच्या उत्तरेकडील भागातून माघार घेतल्यानंतर रशियाने पूर्व युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी केली असताना युद्धनौका बुडणे हा रशियासाठी मोठा लष्करी आणि प्रतीकात्मक पराभव असेल. काळ्या समुद्रात रशिया आता तितका 'शक्तिशाली' राहिलेला नाही याआधी रशियाने सांगितलं की मोस्कवा या युद्धनौकेला लागलेल्या आगीमुळे त्यांच्या सर्व क्रू सदस्यांना माघार घ्यावी लागली. या जहाजावर साधारणपणे 500 खलाशी असतात. रशियानं नंतर सांगितलं की आग आटोक्यात आणली गेली आहे आणि त्यांच्या क्षेपणास्त्र लाँचर्सचे नुकसान झाले नाही. ते बंदरात आणले जाईल. एका लष्करी विश्लेषकाच्या मते, जहाजावर 16 क्षेपणास्त्रे होती आणि जहाज युद्धातून माघार घेतल्यानं काळ्या समुद्रातील रशियाच्या लष्करी क्षमतेवर विपरित परिणाम होईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या