Home /News /videsh /

युद्धाचा रशियाला फटका, बड्या कंपन्यांनी सोडली साथ; देशाला बेरोजगारीची भीती

युद्धाचा रशियाला फटका, बड्या कंपन्यांनी सोडली साथ; देशाला बेरोजगारीची भीती

russia ukraine war

russia ukraine war

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मोठ्याप्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. अनेक बड्या कंपन्यांनी रशियाची साथ सोडली आहे. यामुळे आता रशियात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 9 मार्च: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मोठ्याप्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. गेल्या चौदा दिवसांमध्ये सहाशेहून अधिक मिसाईल रशियाने युक्रेनवर डागल्या आहेत. रशियाच्या या भूमिकेमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियाची साथ सोडली आहे. जागतिक महसत्ता असलेल्या अमेरिकेनेही रशियावर असंख्य निर्बंध घातले असून रशियाची अर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न एकवटलेले देश करत आहे. एकिकडे हे निर्बंधसत्र सुरु असतानाच काही जागतिक कंपन्यांनीही रशियात त्यांची उत्पादे विकणे तात्पुरते थांबवले आहे. मंगळवारी रात्री उशिरा, फेरारी आणि लॅम्बोर्गिनीसह इतर अनेक कंपन्यांनी रशियामधील त्यांचे व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली. L'Oreal ने रशियामधील ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय युनिलिव्हरने रशियाला उत्पादनांची निर्यात आणि आयात स्थगित करण्याची घोषणाही केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मॅकडोनाल्ड रशियामधील सर्व 850 रेस्टॉरंट तात्पुरते बंद करत आहे. परंतु, कंपनी रशियातील आपल्या 62,000 कर्मचाऱ्यांना पगार देणे सुरू ठेवेल आहे. रॉयटर्सच्या वृत्तनुसार स्टारबक्स देखील रशियामधील आपली कॅफे अनिश्चित काळासाठी बंद करणार आहे. तसेच, कोकाकोला, यूनिवर्सल म्यूजिक ग्रुप, पेप्सीको, नेटफ्लिक्स या कंपन्यांनीदेखली रशियामधील आपला कारभार बंद केला आहे. अॅपलने रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री बंद केली आहे. यासोबतच, वृत्तवाहिनी आरटी आणि वृत्तसंस्था स्पुटनिक यांचे प्रेक्षेपण न दाखवण्याचीही घोषण अॅपलने केली आहे. युट्यूबने रशियामधील सरकारी माध्यांचे चॅनल ब्लॉक केले आहे. याआधी मास्टरकार्ड, वीजा, युपीएस आणि फेडएक्सने रशियामधील आपला कारभार व सर्व सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, ब्रुअर कार्ल्सबर्ग आणि जपाह टोबॅकोने युक्रेन मधील आपले कारखाने बंद केले आहेत. यामुळे आता रशियात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या