मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: सशस्त्र रशियन सैनिकाशी एकटी भिडली युक्रेनियन महिला, Watch Video

Russia-Ukraine War: सशस्त्र रशियन सैनिकाशी एकटी भिडली युक्रेनियन महिला, Watch Video

Russia-Ukraine War:रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Russia-Ukraine War:रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Russia-Ukraine War:रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
कीव, 26 फेब्रुवारी: रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये युक्रेनची एक महिला शस्त्रधारी रशियन सैनिकाशी भिडताना दिसत आहे. रशियन सैनिकांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेनं रशियन सैनिकाला दिलेल्या उत्तरानंतर तिचं खूप कौतुक होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी, एक महिला सशस्त्र रशियन सैनिकाशी भिडताना व्हिडिओत दिसत आहे. ती महिला सैनिकाला खूप वाईट पद्धतीनं सुनावते. त्या महिलेला रशियन सैनिक शांत राहण्यास सांगतो. त्यानंतर ती महिला उत्तर देते की, तुम्ही आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तुम्ही फॅसिस्ट आहात! आमच्या भूमीवर बंदुका घेऊन काय करत आहात? मग त्या महिलेनं रशियन सैनिकाला सूर्यफुलाच्या बिया खिशात ठेवण्यास सांगितल्या आणि म्हटलं की तुमच्या मातीतून फक्त सूर्यफूल उगवेल. हा व्हिडिओ पाहून महिलेच्या धाडसाचे कौतुक होत आहे. रशियाच्या टँकनं चिरडली रस्त्यावरुन जाणारी कार या युद्धाशी संबंधित एक अतिशय भयानक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता रस्त्यावरून जात असलेलं एक टँक अचानक आपला मार्ग बदलून दुसऱ्या दिशेनं जाणाऱ्या कारला धडक देतो.
टँक कारच्या वर चढते, ज्यामुळे कारचा चक्काचूर होतो. आता या कारमध्ये एक व्यक्ती होता. ज्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. कारला पायदळी तुडवणारा टँक रशियाचा होता, जो युक्रेनच्या रस्त्यावर फिरत होता. रशिया-युक्रेन युद्धाचे सॅटेलाइट Photos युद्धादरम्यान काही सॅटेलाइट फोटो (Satellite images) समोर आले आहेत. ज्यावरून असं समजलं आहे की किमान 150 रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopters) आणि सर्व सैनिक युक्रेन सीमेपासून काही अंतरावरच तैनात आहेत. मॅक्सर टेक्नॉलॉजीनं (Maxer Technology) हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. असं सांगण्यात आले आहे की, त्यांची उपस्थिती दक्षिणी बोलारुसमध्ये आहे. फोटोंमध्ये बेलारूसी शहर चोजनिकीजवळ मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत, 90 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर रस्त्यावर उभी होते. खासगी यूएस कंपनीच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी घेतलेल्या उपग्रह फोटोंमध्ये दक्षिण बेलारूसमध्ये अनेक मोठ्या भूदल तैनात आणि सुमारे 150 ट्रासपोर्ट हेलिकॉप्टर युक्रेनियन सीमेपासून सुमारे 20 मैलांवर दिसले. त्याचवेळी, बेलारूसी शहर चोजनिकीजवळ रस्त्यावर उभी असलेली 90 हून अधिक हेलिकॉप्टर, त्यांची तैनाती पाच मैलांच्या परिसरात पसरलेली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसत नाही.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या