मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

युक्रेनचा शूरवीर सैनिक! रशियाचे रणगाडे रोखण्यासाठी पुलासह स्वतःलाच बाँबने दिलं उडवून

युक्रेनचा शूरवीर सैनिक! रशियाचे रणगाडे रोखण्यासाठी पुलासह स्वतःलाच बाँबने दिलं उडवून

Vitaly Shakun

Vitaly Shakun

रशियाच्या या आक्रमणासमोर हार न मानता युक्रेन आपल्या शूर सैनिकांच्या (Ukraine Army) आणि देशासाठी प्राणाची बाजी लावायला तयार असलेल्या देशाभिमानी नागरिकांच्या बळावर या हल्ल्यांना तोंड देत आहे.

कीव, 26 फेब्रुवारी: रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर (Russia Attacked Ukraine) सगळं जग युद्ध (Russia-Ukraine War) थांबवण्याचे करण्याचं आवाहन करत आहे; मात्र त्याला दाद न देता बलाढ्य रशिया लहानशा युक्रेनवर जोरदार हल्ले करत आहे. रणगाडे, लढाऊ जेट विमानं यांच्यासह रशियाचे लाखो सैनिक युक्रेनची राजधानी कीवसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर हल्ले चढवत आहेत; मात्र रशियाच्या या आक्रमणासमोर हार न मानता युक्रेन आपल्या शूर सैनिकांच्या (Ukraine Army) आणि देशासाठी प्राणाची बाजी लावायला तयार असलेल्या देशाभिमानी नागरिकांच्या बळावर या हल्ल्यांना तोंड देत आहे. जगभरात सर्वत्र रशियावर टीका होत आहे, तर युक्रेनच्या हिमतीला दाद दिली जात आहे. युक्रेनचे एकापेक्षा एक शूरवीर सैनिक पराक्रमाची शर्थ करत असून, एका सैनिकाच्या अतुलनीय पराक्रमाने तर जग थक्क झालं आहे. व्हिटाली शाकून (Vitaly Shakun) असं या शूरवीराचं नाव आहे. या तरुण सैनिकाने रशियन फौजांना रोखून धरण्यासाठी एक पूल उद्ध्वस्त करण्याकरिता स्वत:लाच बॉम्बसह (Ukrainian Soldier Blow himself) उडवून दिलं. त्यामुळे हा पूल उद्ध्वस्त झाला आणि रशियन फौजांचा मार्ग अडवला गेला. देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या या शूरवीराची कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. हे वाचा-Russia-Ukraine War: रशिया विरूद्ध युद्धात उतरणार बॉक्सिंग चॅम्पियन डेली मेलच्या वृत्तानुसार, रशियाच्या आधिपत्याखाली असलेल्या क्रीमियाच्या (Crimea) खेरसॉन (Kherson) भागातून हाईन्शिक (Heinchesk Bridge) हा पूल युक्रेनला जोडतो. रशियन फौजा रणगाडे (Tanks) घेऊन कीव्हमध्ये (Kyiv) घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे युक्रेनच्या लष्करानं हा पूल उडवून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्हिटाली शाकून यांच्या तुकडीला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. रशियन सैन्य पूल पार करून शहरात शिरू नये यासाठी हा पूल पूर्णतः उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं. काहीही झालं, तरी रशियन फौजांना हा पूल पार करू द्यायचा नाही, असा निर्धार करून व्हिटाली शाकून पुढे सरसावले आणि त्यानं स्वत:च्या शरीराभोवती बॉम्ब (Bomb) लावून त्याचा स्फोट घडवला आणि हा पूल उडवून दिला. हे वाचा-सशस्त्र रशियन सैनिकाशी एकटी भिडली युक्रेनियन महिला, Watch Video स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन या शूरवीराने आपल्या देशाचं रक्षण केलं. व्हिटाली शाकूनच्या अतुलनीय शौर्यासाठी त्याला मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. कीव्हवर ताबा मिळवण्यासाठी पुढे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याला युक्रेनच्या सैन्याकडून कडवा विरोध होत असल्यानं त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही, असं निरीक्षण एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यानं नोंदवलं आहे.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

पुढील बातम्या