Home /News /videsh /

युद्धाच्या 50 व्या दिवशी मोठा ट्विस्ट, काळ्या समुद्रातल्या घटनेनं रशियाला मोठा झटका

युद्धाच्या 50 व्या दिवशी मोठा ट्विस्ट, काळ्या समुद्रातल्या घटनेनं रशियाला मोठा झटका

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या युक्रेनच्या भेटीनंतर रशियन युद्धनौकेवर स्फोट झाला. या भेटीत जॉन्सन युक्रेनला मदत करण्यासाठी 120 चिलखती वाहनं आणि नवीन अँटी शिप मिसाईल सिस्टम पाठवण्याबद्दल बोलले होते.

    मॉस्को, 14 एप्रिल : आज रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) 50 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात रशियाचं मोठं नुकसान झालंय. हजारो रशियन सैनिक मारले गेले आहेत. गुरुवारी रशियन सैन्याला मोठा झटका बसला. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाची सर्वात मोठी युद्धनौका काळ्या समुद्रात नष्ट झाली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं काळ्या समुद्रात युद्धनौका नष्ट (Russian Warship Damaged) झाल्याची पुष्टी केली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, युद्धनौकेवर तैनात असलेल्या सर्व क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, रशियाची ही मिसाईल क्रूझर (missile cruiser) काळ्या समुद्रात तैनात होती आणि सतत शत्रूंवर नजर ठेवत होती. पण ही युद्धनौका आता नष्ट झाली आहे. यावर झालेल्या स्फोटात मिसाईल क्रूझरचं मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार, युद्धनौकेवर ठेवलेला दारूगोळाही स्फोटाच्या कचाट्यात आला. याला रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दुजोरा दिला आहे. तथापि, यापूर्वी युक्रेनकडून असा दावा करण्यात आला आहे की, आपल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काळ्या समुद्रात उभ्या असलेल्या रशियन युद्धनौकेचा स्फोट झाला आहे. परंतु स्वतंत्र वृत्तात अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही. युक्रेनियन सैन्याने बुधवारी क्षेपणास्त्र हल्ल्याने युद्धनौकेचं नुकसान केलं, असा दावा ओडेसाच्या गव्हर्नरने केला. परंतु, या दाव्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत. हे वाचा - Brooklyn Attack : हल्लेखोराची ओळख पटली, माहिती देणाऱ्याला 50,000 डॉलर्सचं बक्षीस या रशियन युद्धनौकेचे नाव मॉस्कवा असून ती अत्यंत विनाशकारी युद्धनौकेच्या श्रेणीत येते. या युद्धनौकेची लांबी 600 फूट होती. याचं वजन 12 हजार 500 टन होतं. ही पहिल्यांदा 1979 मध्ये कार्यान्वित झाली होती. या युद्धनौकेच्या माध्यमातून रशियन सैन्याला मार्गदर्शित क्रूझर क्षेपणास्त्रं डागण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली होती. हे वाचा - पृथ्वीकडे सरकणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा धूमकेतू, ताशी 35 हजार किमीचा वेग रशियन संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, या युद्धनौकेवर 510 क्रू मेंबर्स होते आणि युद्धनौकेवर झालेल्या स्फोटानंतर सर्व क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यासाठी मोठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या युक्रेनच्या भेटीनंतर रशियन युद्धनौकेवर स्फोट झाला. या भेटीत जॉन्सन युक्रेनला मदत करण्यासाठी 120 चिलखती वाहनं आणि नवीन अँटी शिप मिसाईल सिस्टम पाठवण्याबद्दल बोलले होते.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin, War

    पुढील बातम्या