Home /News /videsh /

Russia-Ukraine War: युक्रेनियन नागरिकांच्या जमावात अडकला रशियन सैनिक, असा वाचवला स्वतःचा जीव; Watch Video

Russia-Ukraine War: युक्रेनियन नागरिकांच्या जमावात अडकला रशियन सैनिक, असा वाचवला स्वतःचा जीव; Watch Video

Russia-Ukraine War: सलग 9 दिवसांपासून रशिया (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ले करत आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या रस्त्यावर बॉम्ब, दारूगोळा घेऊन उतरले आहे.

    कीव, 04 मार्च: सलग 9 दिवसांपासून रशिया (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ले करत आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या रस्त्यावर बॉम्ब, दारूगोळा घेऊन उतरले आहे. अत्याधुनिक शस्त्रे आणि शक्तिशाली रणगाडे असूनही युक्रेनियन नागरिक मागे हटायला तयार नाहीत. ते नि:शस्त्र रशियन सैनिकांशी लढत आहेत. अनेक शहरांमध्ये रशियन सैनिकांना (Russian Soldier)ओलीस ठेवलं जात आहे आणि तर काही ठिकाणी त्यांना कुठेतरी हाकलून दिलं जात आहे. असाच कोनोटॉप (Konotop) शहरातला एक व्हिडिओ समोर आला आहे. येथे एक रशियन सैनिक संतप्त युक्रेनियन जमावाच्या भोवऱ्यात अडकला आणि त्याने आपला जीव वाचवण्यासाठी पूर्णपणे फिल्मी स्टाईल वापरली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये युक्रेनचे लोक त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहेत. त्याचवेळी ते 'शेम-शेम' अशा घोषणाही देत ​​आहेत. पण शरणागती पत्करण्याऐवजी रशियन सैनिक आपल्याजवळ ठेवलेला हँडग्रेनेड दोन्ही हातात घेतो आणि गर्दीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी जागा बनवताना दिसतो. धोका असूनही लढा थेट जीवाला धोका असतानाही युक्रेनचे लोक मॉस्कोच्या या सैनिकाला सामोरे जात असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. एक व्यक्ती म्हणतो, तुमचा ग्रेनेड बाहेर काढून चालू नका. काही लोक ग्रेनेडच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून ते लढण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना प्रकरण युक्रेनच्या दक्षिण किनारी शहरातील आहे. लढा किंवा शरण जा या रशियन सैनिकानं कोनोटॉपचे महापौर आर्टेम सेमेनिखिन यांच्याशीही फोनवर संवाद साधला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सैनिकानं महापौरांना एकतर आत्मसमर्पण करा किंवा लढा असा अल्टिमेटम दिला. हा सैनिक निघून गेल्यावर महापौरांनी तेथे उभ्या असलेल्या जमावाला दोन्ही पर्यायांबाबत सांगितले आणि विचारले तुम्हाला काय हवे आहे? युक्रेनियन लोकांनी उत्तर दिले, 'युद्ध'.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या