मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

युक्रेनमधला आतापर्यंतचा सर्वात भयानक VIDEO, रशियन सैन्याचा नागरिकांवर हल्ला, घटना कॅमेऱ्यात कैद

युक्रेनमधला आतापर्यंतचा सर्वात भयानक VIDEO, रशियन सैन्याचा नागरिकांवर हल्ला, घटना कॅमेऱ्यात कैद

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले. पण आता मन सुन्न करणारा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले. पण आता मन सुन्न करणारा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले. पण आता मन सुन्न करणारा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.

  • Published by:  Chetan Patil
कीव, 6 मार्च : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा (Russia Ukraine War) आज अकरावा दिवस आहे. या युद्धादरम्यानचे आतापर्यंत अनेक व्हिडीओ (Video) समोर आले आहेत. रशियाने युक्रेनधील अनेक शहरांवर मिसाईल हल्ले करुन ती शहरे उद्ध्वस्त केली. रशियाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले. पण आता मन सुन्न करणारा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या मनात माणुसकी खरंच मेलीय का? असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होईल. नेमकं प्रकरण काय? युक्रेनमध्ये अडकलेल्या जगभरातील विविध नागरीक, विद्यार्थी आणि युक्रेनियन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियाने ग्रीन कॉरिडोअरला सहमती दिली आहे. पण प्रत्यक्षात युरोपात भलतंच काहीतरी घडत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या ग्रीन कॉरिडोअरद्वारे नागरिकांना देशातून बाहेर काढलं जात आहे त्यावरच रशियन सैन्याकडून हल्ला करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा पुरावा म्हणून एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. अतिशय थरकाप उडविणारा हा व्हिडीओ आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहराजवळील इरपिन शहरात संबंधित प्रकार घडला आहे. ग्रीन कॉरिडोअरच्या माध्यमातून नागरिकांना देशातून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. पण या दरम्यान इरपिन शहरात कॉरिडोअरमधून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला रशियन सैन्याकडून करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियन सैन्याने केलेल्या या हल्ल्यात एक नागरीक जमीनीवर पडतो. त्यानंतर युक्रेनियन सैन्य त्या नागरिकाला वाचविण्यासाठी बाहेर पडतं. पण तोपर्यंत उशिर झालेला असतो. अतिशय जलद या सगळ्या घडामोडी घडतात. (देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अज्ञाताने फिरकावली चप्पल, LIVE VIDEO) दरम्यान,  रशियाने युद्ध थांबविण्यासाठी युक्रेनकडे एक अट ठेवली आहे. युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांत रशियाकडे द्या, अशी मागणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी केली आहे. डोनेट्स्क (Donetsk) प्रांत रशियाकडे सोपवला तर युद्ध संपवू, असं पुतीन म्हणाले आहेत. तसेच युक्रेनमधून नाझीवीदींना हद्दपार व्हावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत. पुतीन यांनी युद्धाच्या दहाव्या दिवशी ही महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. युक्रेनचे कीव्ह, खारकीव्हसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केल्यानंतर पुतीन यांनी मोठी मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनेट्स्क युक्रेनच्या पूर्व सीमा भागात आहे. तिथे रशियाचे समर्थक देखील आहेत.
First published:

पुढील बातम्या