Home /News /videsh /

Russia-Ukraine War: शांततेसाठी युक्रेनला गेलेल्या चेल्सी FCच्या मालकावर केमिकल Attack

Russia-Ukraine War: शांततेसाठी युक्रेनला गेलेल्या चेल्सी FCच्या मालकावर केमिकल Attack

Russia Ukraine War: मार्चच्या सुरुवातीला राजधानी कीवमध्ये युक्रेनियन शांतता वार्ताकारांच्या भेटीसाठी आला होता, तेव्हा त्याच्यावर केमिकल हल्ला झाला.

    कीव, 29 मार्च: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दरम्यान युक्रेनमध्ये केमिकल हल्ल्याचं (Chemical Attack)युग सुरू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. शांतता वार्ताकारांसह कीवमध्ये आलेल्या रशियन अब्जाधीशावर केमिकल हल्ला झाल्याचं समजतंय. प्रसिद्ध युरोपियन फुटबॉल क्लब चेल्सी एफसीचा मालक रोमन अब्रामोविच (Russian billionaire Roman Abramovich) मार्चच्या सुरुवातीला राजधानी कीवमध्ये युक्रेनियन शांतता वार्ताकारांच्या भेटीसाठी आला होता, तेव्हा त्याच्यावर केमिकल हल्ला झाला. 'वॉल स्ट्रीट जनरल'च्या रिपोर्टनुसार, रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच आणि युक्रेनियन वार्ताकारांवर विषाने हल्ला करण्यात आला. अब्रामोविचसह तीन जणांनी अंग दुखी, डोळे लाल होणं आणि चेहरा आणि हातावर स्किन निघणं यासह विचित्र लक्षणे दर्शविली. रोमन अब्रामोविच रशिया आणि युक्रेनमधील युद्धात शांतता निर्माण करणारे म्हणून काम करत होते. अब्रामोविच व्यतिरिक्त आणखी एक रशियन उद्योगपती आणि युक्रेनचे खासदार उमरोव हे देखील या बैठकीत उपस्थित होते. नोकरीच्या बहाण्यानं पुण्यात आणलं अन्..; सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन तरुणींची सुटका, दोघांना अटक रिपोर्टनुसार, 3 मार्च रोजी रात्री 10 वाजेपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर या तिघांना केमिकल शस्त्रांनी विषबाधा झाल्याची लक्षणे जाणवली. सूत्रांच्या हवाल्याने वार्ताकारांनी मॉस्कोमध्ये बसलेल्या अतिरेक्यांनी केमिकल हल्ले केल्याचा आरोप केला आहे. किंबहुना, या कट्टरवाद्यांना युद्ध संपुष्टात येऊ नये, म्हणून त्यांना शांतता चर्चा पूर्णपणे अयशस्वी बनवायची आहे. आज तुर्कीमध्ये शांततेवर चर्चा होणार त्याचवेळी रशिया आणि युक्रेनमधील शांततेबाबत आज तुर्कीस्तानमध्ये चर्चा होणार आहे. चर्चेपूर्वी ते युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळांची भेट घेणार असल्याचे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी सांगितलं. एर्दोगान यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या टेलीव्हिजनच्या भाषणात सांगितलं की, ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर स्वतंत्रपणे बोलत आहेत आणि दोन्ही नेत्यांशी चर्चा योग्य दिशेनं सुरू आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या