कीव, 18 मार्च: गेल्या 24 तासांत रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war) युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूर्व युक्रेनमध्ये ( eastern Ukraine) 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रशिया युक्रेनवर जोरदार हल्ले करत असून या गोळीबारामुळे एकूण 53 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युद्धाचा सामना करत असलेल्या युक्रेनमध्ये 22 व्या दिवशीही अशांतता कायम आहे. रशियन क्षेपणास्त्रे आणि बॉम्बमुळे तीन शहरांतील अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. मध्यरात्रीही हल्ले होत आहेत आणि दिवसाही अनेकदा स्फोट होत आहेत. राजधानी कीवला सर्वाधिक लक्ष्य करण्यात आलं असून मध्यरात्रीही हल्ला करण्यात आला आहे.
रशियाने निवासी भागातील नागरिकांची घरे आणि इमारतींना लक्ष्य केल्याचं वृत्त युक्रेनियन माध्यमांनी दिलं आहे. रशियन सैन्य जोरदार हल्ला करत आहे. कीव नंतर खार्किववर जोरदार गोळीबार झाला आणि संपूर्ण शहर नष्ट झालं आहे. शेकडो घरांचे नुकसान झालं आहे.
मार्केट आणि इतर इमारतींवर अजूनही हवाई हल्ले होत आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशियाच्या हल्ल्यात किमान 21 जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. जखमींवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येतेय.
युक्रेन युद्धामुळे रशियासोबतची मंगळ मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचं युरोपियन स्पेस एजन्सीनं म्हटलं आहे. यापूर्वी रशियन-युरोपियन मंगळ मोहिमेबाबत अनेक चर्चा झाल्या होत्या.
आता वृत्तांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, युक्रेनमध्ये जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे आणि या हल्ल्यात 108 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी युक्रेनकडून जाहीर करण्यात आली आहे. युक्रेनला रशियन हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ब्रिटनची मदत होत आहे. ब्रिटनने युक्रेनच्या जवळ असलेल्या पोलंडमध्ये क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा बसवण्याबाबत बोलणं केलं आहे, जेणेकरून युक्रेनला त्याद्वारे मदत करता येईल.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.