मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: रशियाच्या टँकनं चिरडली रस्त्यावरुन जाणारी कार, अंगावर काटा येणारा भयानक Video Viral

Russia-Ukraine War: रशियाच्या टँकनं चिरडली रस्त्यावरुन जाणारी कार, अंगावर काटा येणारा भयानक Video Viral

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्यानं (Russian forces) युक्रेनच्या (Ukraine)  अनेक भागात हल्ले करून लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवच्या रस्त्यांवर युद्ध सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
कीव, 26 फेब्रुवारी: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाची तीव्रता आणखीन वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्यानं (Russian forces) युक्रेनच्या (Ukraine) अनेक भागात हल्ले करून लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवच्या रस्त्यांवर युद्ध सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचा इशारा दिला आहे. खिडकीतून डोकावण्याची किंवा बाल्कनीतून बाहेर पाहण्याची चूक करू नका. यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशिया राजधानी कीववर हल्ला करू शकतो, असा इशारा यापूर्वीच दिला होता. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इकडे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानंही दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत 1000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. या युद्धाशी संबंधित एक अतिशय भयानक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता रस्त्यावरून जात असलेलं एक टँक अचानक आपला मार्ग बदलून दुसऱ्या दिशेनं जाणाऱ्या कारला धडक देतो. टँक कारच्या वर चढते, ज्यामुळे कारचा चक्काचूर होतो. अल जजीरा या वृत्तवाहिनीनं हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आता या कारमध्ये एक व्यक्ती होता. ज्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. कारला पायदळी तुडवणारा टँक रशियाचा होता, जो युक्रेनच्या रस्त्यावर फिरत होता. रशिया-युक्रेन युद्धाचे सॅटेलाइट Photos युद्धादरम्यान काही सॅटेलाइट फोटो (Satellite images) समोर आले आहेत. ज्यावरून असं समजलं आहे की किमान 150 रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopters) आणि सर्व सैनिक युक्रेन सीमेपासून काही अंतरावरच तैनात आहेत. मॅक्सर टेक्नॉलॉजीनं (Maxer Technology) हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. असं सांगण्यात आले आहे की, त्यांची उपस्थिती दक्षिणी बोलारुसमध्ये आहे. फोटोंमध्ये बेलारूसी शहर चोजनिकीजवळ मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत, 90 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर रस्त्यावर उभी होते. खासगी यूएस कंपनीच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी घेतलेल्या उपग्रह फोटोंमध्ये दक्षिण बेलारूसमध्ये अनेक मोठ्या भूदल तैनात आणि सुमारे 150 ट्रासपोर्ट हेलिकॉप्टर युक्रेनियन सीमेपासून सुमारे 20 मैलांवर दिसले. त्याचवेळी, बेलारूसी शहर चोजनिकीजवळ रस्त्यावर उभी असलेली 90 हून अधिक हेलिकॉप्टर, त्यांची तैनाती पाच मैलांच्या परिसरात पसरलेली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसत नाही.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या