मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: रिपोर्टिंग करताना इमारतीवर Rocket हल्ला, पत्रकार जीव वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

Russia-Ukraine War: रिपोर्टिंग करताना इमारतीवर Rocket हल्ला, पत्रकार जीव वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सध्या युद्ध सुरु आहे. रशियानं युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare
खार्किव, 03 मार्च: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सध्या युद्ध सुरु आहे. रशियानं युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. या युद्धाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. रशिया युक्रेनवर कधी बॉम्ब हल्ला (bomb attack), रॉकेट हल्ला (rocket attack), मिसाईल हल्ला (missile attacks) करत आहे. या हल्ल्याची भीषणता दाखवणारे व्हिडिओ समोर येत आहे. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका पत्रकाराचा आहे. हा पत्रकार रिपोर्टिंग करताना रशियानं केलेल्या रॉकेट हल्ल्याचा आहे. खार्किवमध्ये मोजो पत्रकार रिपोर्टिंग करत होता. त्याच वेळी रशियन सैन्यानं इमारतीवर रॉकेट हल्ला केला. रॉकेट हल्ला होताच त्याचा भयानक आवाज व्हिडिओत ऐकू येत आहे. तसंच हल्ला होताच इमारतही ढासळते. या हल्ल्यानंतर पत्रकार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथून पळत असताना त्या व्हिडिओत कैद झालं आहे. रशियाचा पुन्हा कीववर हल्ला, हिंसक स्फोटाचा भयानक आवाज रशिया युक्रेनची राजधानी कीववर सतत हल्ले करत आहे. कीव सध्या रशियन सैन्याच्या हल्ल्याखाली आहे. कीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सतत वाजत आहेत. कारण संपूर्ण कीवमध्ये हिंसक स्फोट होत आहेत. याचाच आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून युद्धाची भीषणता दिसून येत आहे. आताच एक भयानक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ युक्रेनची राजधानी कीवमधला आहे. रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये टीव्ही टॉवरवर मिसाइल हल्ला याआधी रशियन सैन्याने एका टीव्ही टॉवर हल्ला चढवला आहे. मिसाईलचा मारा करून टॉवर उद्धवस्त केलं आहे. युक्रेनमधील टीव्ही टॉवरवर हल्ला चढवून उद्धवस्त केलं. मिसाईलचा मारा करून पूर्ण टॉवर नष्ट केलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर युक्रेनमध्ये संपूर्णपणे टीव्ही आता बंद पडले. रशियन सैनिकांच्या हल्ल्याचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली का, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. कीव शहरात रशियन सैन्यानं जोरदार हल्ला चढवला आहे. लाखो रहिवासी हे युक्रेनमधून पलायन करत आहे.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या