Home /News /videsh /

Russia-Ukraine War: पुतीन यांनी जागतिक नेत्यांचे आवाहन पुन्हा फेटाळले, युद्ध रोखण्यास दिला स्पष्ट नकार

Russia-Ukraine War: पुतीन यांनी जागतिक नेत्यांचे आवाहन पुन्हा फेटाळले, युद्ध रोखण्यास दिला स्पष्ट नकार

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. गेल्या 17 दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. युक्रेनमधील प्रमुख शहरं रशियाच्या हल्ल्यामुळे बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 मार्च: रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. युक्रेनमधील प्रमुख शहरं रशियाच्या हल्ल्यामुळे बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत. असे असले तरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युद्ध मागे घेण्यास नकार दिला आहे. हे युद्ध थांबवावे, असे आवाहन जगभरातून केले जात आहे. पण रशियन राष्ट्राध्यक्ष युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नाहीत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या 75 मिनिटांच्या चर्चेनंतर, शांततेच्या आवाहनाचा रशियावर कोणताही परिणाम होत नसल्याचे म्हटले आहे. चर्चेत काय झाले ? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांनी ‘युक्रेनच्या अणू प्रकल्पाला लक्ष्य करू नका’, असे आवाहन केले. यावर पुतिन यांनी मॅक्रॉन यांना सांगितले की, युक्रेनच्या अणू प्रकल्पावर आक्रमण करण्याचा माझा हेतू नाही. बिघडलेल्या परिस्थितीमध्ये रशियन सैन्य राजधानी कीव (कीव) जवळ पोहोचले आहे. शनिवारी कीवच्या आसपासच्या भागात जोरदार गोळीबार झाला. क्षेपणास्त्रांनी राजधानीजवळील वासिलकिव्ह येथील एअरबेस आणि शस्त्रास्त्र डेपोवर आदळली आणि त्यांचा नाश केला. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन सैन्य राजधानी कीवपासून फक्त 25 किमी ईशान्येस आहे. रशियन सैन्याने खार्किव, चेर्निहाइव्ह, सुमी आणि मारिओपोलला वेढा घातला. युक्रेनचे सैन्य आघाडीवर उभे आहे, पण हीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत रशियन फौजा कीवपर्यंत पोहोचतील. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दावा केला की, रशियाला नवीन सैन्य पाठवण्यास भाग पाडले गेले कारण त्यांच्या सैनिकांनी आतापर्यंत रशियाच्या 31 बटालियनला चिरडले आहे. रशियाचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे नुकसान असल्याचा दावा त्यांनी केला. या युद्धात युक्रेनचे 1300 हून अधिक सैनिकही मारले गेले आहेत. झेलेन्स्कीने रशियाला इशारा दिला की जर त्याने राजधानी कीवमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला किंवा बॉम्ब फेकले तर त्याला आपल्या सर्वांच्या मृतदेहांवरून जावे लागेल. इथला इतिहास पुसून टाकावा लागेल. पण आम्ही येथे रशियन सैनिकांना तोंड देण्यासही तयार आहोत. चेर्निहाइव्हच्या गव्हर्नरने डोळ्यात अश्रू आणत व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की येथे काहीही शिल्लक नाही. सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पण युक्रेन आता उभे राहिले आहे आणि उभे राहील. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पश्चिमेला पुतिन यांना पटवून युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की यांनी यासंदर्भात जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. यानंतर जर्मनी आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. 75 मिनिटांच्या चर्चेनंतर क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनात युद्धबंदीबाबत काहीही सांगण्यात आले नाही. याउलट अमेरिका तणाव वाढवून परिस्थिती गुंतागुंतीची करत असल्याचा आरोप रशियाच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी केला.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या