मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia-Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची मोठी घोषणा, युक्रेनला करणार आणखी मदत

Russia-Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची मोठी घोषणा, युक्रेनला करणार आणखी मदत

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचे आश्वासन दिलं आहे.

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचे आश्वासन दिलं आहे.

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचे आश्वासन दिलं आहे.

न्यूयॉर्क, 17 मार्च: रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहे. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Vladimir Zelensky)यांनी अमेरिकन काँग्रेसला (US Congress) संबोधित केलं. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचे आश्वासन दिलं आहे.

बायडेन म्हणाले की, रशियन सैन्यानं मारिओपोलमधील रुग्णालयावर ज्या प्रकारे जोरदार बॉम्बफेक केली आहे, ते पाहून आम्ही युक्रेनला आणखी धोकादायक शस्त्रे देण्याचं ठरवलं आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या पाठीशी अमेरिका उभी असून युक्रेनच्या जनतेला सर्वतोपरी मदत करेल, असंही ते म्हणाले.

आम्ही युक्रेनला 200 मिलियन डॉलर मदत पाठवली आहे आणि या आठवड्यात आणखी 1 बिलियन डॉलर मदत पाठवू, असं बायडेन यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले जो बायडेन

रशियाने मारिओपोलच्या हॉस्पिटलवर ज्या प्रकारे जोरदार बॉम्ब हल्ला केला. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये रशियाविरोधातील संताप वाढत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची धमकी आम्ही गांभीर्यानं घेतली आहे. त्यामुळेच आम्ही युक्रेनला आणखी धोकादायक शस्त्रे देण्याची तयारी केल्याचं बायडेन म्हणालेत.

ते म्हणाले की, रशियाला पराभूत करण्यासाठी आम्ही युक्रेनला आणखी शस्त्रे पाठवत आहोत. आम्ही युक्रेनला लाँग रेंज अँटी एअरक्राफ्ट सिस्टम देणार आहोत. याची मोठी किंमत पुतिन यांना चुकवावी लागेल. आम्ही रशियावर आणखी निर्बंध घालणार आहोत. आम्ही रशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे नष्ट करू. या युद्धामुळे जे लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये गेले आहेत, त्यांच्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. या निर्वासितांना मदत करण्याच्या योजनेवर आम्ही काम करत आहोत.

सावध व्हा..! भारताच्या डोक्यावर पुन्हा एकदा Corona चं सावट? समोर आली नवी अपडेट

जो बायडेन म्हणाले की, आपण सर्व मिळून लढूया जेणेकरून पुतिन यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. अमेरिका युक्रेनच्या नागरिकांच्या पाठीशी उभी आहे आणि यापुढेही उभी राहील. अमेरिका नेहमीच स्वातंत्र्यासाठी उभी राहिली आहे आणि ती त्याच्या पाठीशी आहे.

यापूर्वी झेलेन्स्की म्हणाले होते की, आम्हाला कोणत्याही प्रकारचे युद्ध करायचे नाही. आम्हाला लवकरात लवकर युद्ध थांबवायचे आहे. रशिया सातत्याने हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. परिस्थिती अशी झाली आहे की युक्रेनची सुंदर शहरे आता उध्वस्त झाली आहेत. अमेरिकन संसदेला संबोधित करताना झेलेन्स्की यांनी अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धाची आठवणही करून दिली.

Holi 2022: होळीची पूजा करताना चुकूनही करू नका या गोष्टी

झेलेन्स्की म्हणाले की, रशियन सैन्य आपल्यावर रात्रंदिवस क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे. यावेळी झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडिओही अमेरिकन संसदेला दाखवला. रशियन सैन्य आपल्यावर रात्रंदिवस क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे. रशियन सैन्य आपल्या जमिनीवर नव्हे तर आपल्या हक्कांवर आक्रमण करत आहे. हे आपल्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. अमेरिकेनं रशियावर आणखी कडक निर्बंध लादले पाहिजेत आणि अमेरिकन कंपन्यांनीही रशिया सोडला पाहिजे. यामुळे रशियाची शक्ती कमकुवत होईल आणि त्यामुळे युद्ध थांबेल, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Joe biden, Russia Ukraine