Home /News /videsh /

Russia Ukraine युद्धाचं भीषण वास्तव आलं समोर, एकाच ठिकाणी आढळले 300 मृतदेह

Russia Ukraine युद्धाचं भीषण वास्तव आलं समोर, एकाच ठिकाणी आढळले 300 मृतदेह

Russia Ukraine War news : ज्यांना दफन करण्यात आले त्या सर्वांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं. यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. यात एका 14 वर्षीय मुलाचाही सहभाग असल्याचे महापौरांनी सांगितलं.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 03 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukranie War News) सुरू होऊन 39 दिवस उलटले आहेत. महिना उलटून गेला तरी परिस्थिती स्थिर होण्याचे नाव घेत नाही. युक्रेनच्या लष्करानं पुन्हा एकदा कीववर (Kyiv news) ताबा मिळवला. पण कीवमधून माघार घेण्यापूर्वी तेथे रशियन सैन्याने जो कहर केला तो अंगावर काटा आणणारा आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लोकांना कसं लक्ष्य केलं, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. कीवच्या बाह बूका (Kyiv news bucha City) शहरात 300 लोक एका सामूहिक कबरीत दफन करण्यात आले होते. शहराच्या महापौरांनी रविवारी ही माहिती दिली. एएफपी या वृत्तसंस्थेला माहिती देताना महापौर अनातोला फेझोरुक यांनी सांगितले की, रशियन सैन्याने बाह बुका शहर (Bucha Massacre) ताब्यात घेतले आहे. आम्ही आधीच 280 लोकांना सामूहिक कबरीत दफन केले आहे. ते म्हणाले की, रशियन आक्रमणात बूका शहराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र मृतदेह विखुरलेले आहेत. ज्यांना दफन करण्यात आले त्या सर्वांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचं महापौरांनी सांगितले. यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. यात एका 14 वर्षीय मुलाचाही सहभाग असल्याचं महापौरांनी सांगितलं. त्याचवेळी एका वृत्तसंस्थेने सांगितले की, शहरातील केवळ एका गल्लीत 20 जणांचे मृतदेह सापडले आहेत. हे वाचा - क्रिमिनल रेकॉर्ड लपवल्यानं शिक्षकाला नोकरीतून केलं बडतर्फ; SC चा मोठा निर्णय कीवच्या लढाईत हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. युक्रेनचे सैन्य हळूहळू शहरात दाखल होत आहे. असं सांगितलं जात आहे की कीवमध्ये सर्वत्र मृतदेह दिसत आहेत आणि हे मृतदेह बाहेर काढण्याची भीती सैनिकांनाही वाटत आहे. रिपोर्टनुसार, या मृतदेहांमध्ये स्फोटकांचाही धोका आहे, त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी लष्कराचा वापर करण्यात येत आहे. हे वाचा - VIDEO - बापरे! हे काय आहे? आकाशात दिसला रहस्यमयी आगीचा गोळा; पाहून चक्रावले लोक युक्रेनने या हत्याकांडासाठी रशियाला जबाबदार धरले आहे. परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की, बुचा शहरातून घाईघाईने माघार घेण्यापूर्वी रशियन सैन्याने जाणूनबुजून नरसंहार केला. कुलेबा यांनी ट्विटरवर लिहिले की बुचा हत्याकांड हेतुपुरस्सर होते, कारण रशियन सैन्याने शक्य तितक्या लोकांना मारण्याचे लक्ष्य ठेवले होते.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine

    पुढील बातम्या