मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा नवा Video; म्हणाले, ''पळालो नाही, मी युक्रेनचं संरक्षण करतोय''

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा नवा Video; म्हणाले, ''पळालो नाही, मी युक्रेनचं संरक्षण करतोय''

Russia-Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) हे त्यांच्या मूळ देशात युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Russia-Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) हे त्यांच्या मूळ देशात युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Russia-Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) हे त्यांच्या मूळ देशात युक्रेनमध्ये अडकले आहेत.

  किव, 26 फेब्रुवारी: रशियन हल्ले (Russian attacks) आणि राजधानी कीवला वेढा घातला असूनही राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) हे त्यांच्या मूळ देशात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे याची पुष्टी केली आहे. हा व्हिडिओ स्वतः झेलेन्स्की यांनी जारी केला आहे. व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, आम्ही येथेच आहोत. आम्ही कीवमध्ये आहोत. आम्ही युक्रेनचे रक्षण करत आहोत." याआधी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, मी युक्रेनमध्ये आहे. माझे कुटुंब युक्रेनमध्ये आहे. माझी मुलं युक्रेनमध्ये आहेत. ते देशद्रोही नाहीत ते युक्रेनचे नागरिक आहेत.आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की मी शत्रूच्या (रशिया) पहिल्या टार्गेटवर आहे आणि माझे कुटुंब दुसऱ्या टार्गेटवर आहे. या व्हिडिओत झेलेन्स्की यांना सल्लागार आणि पंतप्रधानांनी वेढलेलं दिसत असून युक्रेनियन राजधानी कीवमधील रस्त्यावरून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
  युक्रेनला रशियन हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ते सतत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशीही चर्चा केली आहे. जो बायडेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात निर्बंध आणि संरक्षण मदत यावर चर्चा झाली आहे. व्हाईट हाऊसनं या संभाषणाची पुष्टी केली आहे आणि सांगितलं की, ते संभाषण सुमारे 30 मिनिटं चालेल. झेलेन्स्की म्हणतात की, ठोस संरक्षण मदत आणि जो बायडेन यांच्याशी युद्धविरोधी युती यावर चर्चा झाली. युक्रेनमधील भारतीयाचं Airlift,470 जणांची पहिली बॅच कोणत्याही क्षणी मायदेशी याशिवाय युक्रेन आणि रशिया चर्चेसाठी ठिकाण आणि वेळ यावर चर्चा करत आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की युक्रेन युद्धविराम आणि शांततेबद्दल बोलण्यास तयार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. मात्र, रशिया कुठूनही मागे हटण्याची चिन्हे दिसत नाही. रशियानं शुक्रवारीही हल्ले सुरूच ठेवले. युक्रेनच्या राजधानीवर हा हल्ला झाला आहे. रशियाच्या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक मारले गेले आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Russia Ukraine, Ukraine news

  पुढील बातम्या