कीव/मॉस्को, 14 एप्रिल : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) आज 50 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. 'एएफपी' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाची सर्वात मोठी युद्धनौका काळ्या समुद्रात नष्ट (Russian Warship Damaged) झाली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने काळ्या समुद्रात युद्धनौका नष्ट झाल्याची पुष्टी केली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, युद्धनौकेवर तैनात असलेल्या सर्व क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, नेपच्यून क्रूझ क्षेपणास्त्राच्या (neptune cruise missile) हल्ल्यानंतर रशियन युद्धनौकेचा स्फोट झाला. चला जाणून घेऊ, काय आहे नेपच्यून क्रूझ मिसाइल? त्याची शक्ती किती आहे?
रशियाच्या सर्वात मोठ्या युद्धनौके मॉस्क्वावर कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्राने हल्ला केला?
युक्रेनचा दावा आहे की मॉस्कोवर दोन जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. या प्रकारच्या क्षेपणास्त्राला नेपच्यून म्हणतात. गंमत म्हणजे, क्षेपणास्त्राची रचना रशियन Kh-35 क्रूझ क्षेपणास्त्रावर आधारित आहे. नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली सुमारे सहा वर्षे संशोधनानंतर मार्च 2021 मध्ये युक्रेनियन संरक्षण दलात समाविष्ट करण्यात आली. क्रूझ क्षेपणास्त्र लष्कराने घाईघाईने विकसित केले होते, कारण 2014 मध्ये क्राइमियाच्या विलीनीकरणानंतर युक्रेनच्या किनारपट्टीवरील रशियन धोका वेगाने वाढत होता. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नेपच्यून हे 300 किमीच्या परिघात नौदलाच्या जहाजांना नष्ट करण्यास सक्षम किनारपट्टीवरील जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
नेपच्यून क्षेपणास्त्राने नष्ट केलेले मॉस्कवा काय आहे?
या रशियन युद्धनौकेचे नाव मॉस्कवा (moskva missile cruiser) असून ती अत्यंत विनाशकारी युद्धनौकेच्या श्रेणीत येते. या युद्धनौकेची लांबी 600 फूट होती. याचं वजन 12 हजार 500 टन होतं. ही पहिल्यांदा 1979 मध्ये कार्यान्वित झाली होती. या युद्धनौकेच्या माध्यमातून रशियन सैन्याला मार्गदर्शित क्रूझर क्षेपणास्त्रं (guided cruiser missile) डागण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.
हे वाचा -
श्रीलंकेच्या स्थितीवरून समजून घ्या, देश दिवाळखोर कसे होतात?
बुधवारी कसा झाला हा हल्ला?
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, या युद्धनौकेवर 510 क्रू मेंबर्स होते आणि युद्धनौकेवर झालेल्या स्फोटानंतर सर्व क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यासाठी मोठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या युक्रेनच्या भेटीनंतर रशियन युद्धनौकेवर स्फोट झाला. ते युक्रेनला मदत करण्यासाठी 120 चिलखती वाहने आणि नवीन जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली (anti-ship missile system) पाठवण्याबद्दल बोलले होते.
हे वाचा -
पृथ्वीकडे सरकणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा धूमकेतू, ताशी 35 हजार किमीचा वेग
नुकसान किती मोठं आहे?
रिपोर्टनुसार, रशियाची ही मिसाईल क्रूझर काळ्या समुद्रात तैनात होती आणि सतत शत्रूंवर नजर ठेवत होती. पण हे मिसाईल क्रूझर आता नष्ट झालं आहे. या स्फोटात मिसाईल क्रूझरचं मोठं नुकसान झाले आहे. रिपोर्टनुसार, युद्धनौकेवर ठेवलेला दारूगोळाही स्फोटाच्या कचाट्यात आला. याला रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.