मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: शून्य डिग्रीमध्ये 35 तास रांगेत उभे.. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून अंगावर येईल काटा

Russia-Ukraine War: शून्य डिग्रीमध्ये 35 तास रांगेत उभे.. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून अंगावर येईल काटा

Russia-Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमधून जीव वाचवत घरी पोहोचलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने बुधवारी युक्रेनियन सैनिकांनी तिच्यासारख्या अनेक वैद्यकीय विद्यार्थिनींचा मानसिक छळ केल्याचे कथन केले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, आपला जीव वाचवून भारतात परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैनिकांनी 'कठपुतळ्यांसारखं' कधी हसायला तर कधी टाळ्या वाजवायला सांगितले.

Russia-Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमधून जीव वाचवत घरी पोहोचलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने बुधवारी युक्रेनियन सैनिकांनी तिच्यासारख्या अनेक वैद्यकीय विद्यार्थिनींचा मानसिक छळ केल्याचे कथन केले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, आपला जीव वाचवून भारतात परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैनिकांनी 'कठपुतळ्यांसारखं' कधी हसायला तर कधी टाळ्या वाजवायला सांगितले.

Russia-Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमधून जीव वाचवत घरी पोहोचलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने बुधवारी युक्रेनियन सैनिकांनी तिच्यासारख्या अनेक वैद्यकीय विद्यार्थिनींचा मानसिक छळ केल्याचे कथन केले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, आपला जीव वाचवून भारतात परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैनिकांनी 'कठपुतळ्यांसारखं' कधी हसायला तर कधी टाळ्या वाजवायला सांगितले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 3 मार्च : रशिया-युक्रेनच्या युद्धात असंख्य भारतीय विद्यार्थी जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशातच युक्रेनमधून (Ukraine) भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express) विमान मंगळवारी सकाळी बुखारेस्ट, रोमानिया येथून मुंबईला पोहोचले. या विमानाने मुंबईत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी घरी परतण्याचा मार्ग तितकासा सोपा नव्हता. गेल्या 4-5 दिवसांत त्यांनी मृत्यूला चुकवत, भारतात परतण्याच्या संघर्षातील प्रत्येक अडचणीवर मात केली. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सध्या 'ऑपरेशन गंगा' सुरू आहे. त्याचवेळी, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या सीमेजवळ शून्याखालील तापमानात 35 तासांपेक्षा जास्त काळ उभे राहून वेळ घालवला. या काळात त्यांना खाण्यापिण्यासारख्या मूलभूत सुविधाही नव्हत्या. कठीण काळ इथेच संपला नाही. असहाय्य आणि थकलेल्या विद्यार्थ्यांना युक्रेनियन सैनिकांकडून मारहाणीचा सामना करावा लागला. मंगळवारी सकाळी एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचले. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी दीनानाथ रे म्हणतात, 'सुमारे 2 हजार भारतीय विद्यार्थी अजूनही बुखारेस्टमधील हेन्री कोआंडा विमानतळावर अडकून पडले आहेत. भारतात येणाऱ्या विमानांमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. रोमानियाशी सामायिक केलेल्या सीमेच्या युक्रेनियन बाजूला आणखी 3,000 आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरभंगाचे सौरभ कुमार म्हणाले, “24 फेब्रुवारीपासून आमच्या वसतिगृहाच्या तळघरात सुमारे 150 भारतीय विद्यार्थी बंकरमध्ये राहत होते. आम्ही सामान घेण्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हतो, दर 15-20 मिनिटांनी हवाई हल्ल्याचे सायरन वाजत होते...' रे यांनी माहिती दिली, 'रोमानियाचा प्रवास आणखी भयानक होता. रोमानिया ओलांडल्यानंतरच त्यांना मानवतावादी प्रयत्नांचा लाभ मिळाला. ते म्हणाले, 'रोमानिया आणि नाटोने सीमेपासून 200 मीटर दूर आश्रयस्थान तयार केले आहेत. तिथे अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्हाला विमानतळावर जाण्यासाठी ब्लँकेट, जॅकेट, मोफत सिमकार्ड आणि कार सेवा देण्यात आली. कुमार यांनी सांगितले की, बुखारेस्टहून मुंबईला जाताना एअर इंडिया एक्स्प्रेस कुवेतमध्ये इंधनासाठी थांबली. विद्यार्थ्याने सांगितले, 'आम्हाला सँडविच, केक, ज्यूस वगैरे दिले होते. पण त्यांनी आम्हाला कुवेत सोडल्यावर बिर्याणी आणि रायता दिला. आम्हाला भारतीय जेवण बऱ्याच दिवसांनी मिळाले. युक्रेनच्या सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना कधी हसायला तर कधी टाळ्या वाजवायला सांगितले: विद्यार्थी युद्धग्रस्त युक्रेनमधून घरी पोहोचलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने त्यांच्यासोबत घडलेली व्यथा सांगितली. ती म्हणाली, बुधवारी पोलंडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी युक्रेनियन सैनिकांनी तिच्यासारख्या अनेक वैद्यकीय विद्यार्थिनींचा मानसिक छळ केला. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, आपला जीव वाचवून भारतात परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैनिकांनी 'कठपुतळ्यांसारखं' कधी हसायला आणि टाळ्या वाजवायला सांगितले. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था, ट्रेनच्या सीटसाठी विकला Ipad हा विद्यार्थी युक्रेनमधील टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर त्यांनी पत्रकारांना सांगितले, "आम्ही 50-60 वैद्यकीय विद्यार्थ्यांनी टेर्नोपिल शहरातून पोलंडच्या बाहेरील भागात जाण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी भाड्याने बसची व्यवस्था केली. पण प्रचंड ट्रॅफिक जाम आणि वाटेत गोंधळामुळे आम्ही या सीमेपासून 45 किमी अंतरावर उतरलो. या विद्यार्थ्याने सांगितले की, वैद्यकीय विद्यार्थी गोठवणाऱ्या थंडीचा सामना करत पायीच पोलंडच्या सीमेवर पोहोचले. परंतु, तेथे तैनात असलेल्या युक्रेनियन सैनिकांनी त्यांना लगेच सीमा चौकी ओलांडू दिली नाही. “युक्रेनियन सैनिक आम्हाला उभे राहण्यास सांगत होते, कधी बसण्यास सांगत होते, त्यांचा कठपुतळी म्हणून वापर करत होते. त्यांनी आम्हाला टाळ्या वाजवायला आणि हसायलाही सांगितलं. मात्र, नंतर विद्यार्थिनींना प्राधान्य देत पोलंडच्या सीमेत प्रवेश देण्यात आला, त्यानंतर ते भारत सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत मायदेशी परतले. युक्रेनमधून पोलंडमार्गे भारतात परतलेल्या आणखी एका वैद्यकीय विद्यार्थ्याने सांगितले की, “युद्धाची शक्यता लक्षात घेऊन भारत सरकारने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले होते. पण तेव्हा युक्रेनमधील आमच्या विद्यापीठात महत्त्वाचे अभ्यास सुरू होते आणि विद्यापीठाच्या परवानगीशिवाय आम्ही भारतात येऊ शकत नव्हतो. रिपोर्टिंग करताना इमारतीवर Rocket हल्ला, पत्रकार जीव वाचवतानाचा थरार दोन्ही विद्यार्थिनींसह युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले सहा विद्यार्थी घरी परतल्यानंतर इंदूरला पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे विद्यार्थी इंदूर, उज्जैन आणि झाबुआ जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. यातील काही विद्यार्थी इंदूर विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर भावूक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इंदूरचे खासदार शंकर लालवानी आणि उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
First published:

Tags: Russia Ukraine

पुढील बातम्या