Home /News /videsh /

Ukraine हून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, उपचारासाठी कीवला हलवलं; व्ही के सिंग यांची माहिती

Ukraine हून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, उपचारासाठी कीवला हलवलं; व्ही के सिंग यांची माहिती

Russia-Ukraine War: युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 04 मार्च: नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याच्या (Indian student) मृत्यूनंतर आता युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. जनरल व्ही के सिंग (General VK Singh) म्हणाले, कीवमधील एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली असून त्याला तात्काळ कीवमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्याला अर्ध्या वाटेतूनच कीव येथे उपचारासाठी नेण्यात आले. पोलंडमध्ये उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भारतीय दूतावासाने प्रथम प्राधान्याने मान्यता दिली होती की प्रत्येकाने कीव सोडावं. युद्धाच्या स्थितीत बंदुकीची गोळी कुणाचा धर्म आणि राष्ट्रीयत्व बघत नाही, असं व्ही के सिंग यांनी म्हटलं आहे. विद्यार्थी सध्या युक्रेनमधून युद्धग्रस्त देश सोडून भारतात सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. चार केंद्रीय मंत्री, हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग, युक्रेनला लागून असलेल्या देशांमधील स्थलांतराच्या प्रयत्नांवर देखरेख करत आहेत. 2 विद्यार्थ्यांचा यापूर्वीच मृत्यू युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात यापूर्वीच 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 1 मार्च रोजी रशियानं युक्रेनमधील खार्किव येथे हवाई हल्ला केला. यामध्ये कर्नाटकातील नवीन शेखरप्पा नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. Breaking News: रशियाचा सर्वात मोठ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर हल्ला, संपूर्ण युरोप धोक्यात; पहा हल्ल्याचा Live Video 2 मार्चला युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत चंदन जिंदाल हा पंजाबचा रहिवासी असून 4 वर्षांपूर्वी युक्रेनला वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी गेला होता. 2 फेब्रुवारी रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने चंदनचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचं म्हटल होतं. युक्रेनमधील भारतीय दूतावास आमच्या नागरिकांना सल्ला देत आहे. दूतावासाने याआधी कीव आणि खार्किव सोडून कोणत्याही परिस्थितीत इतरत्र पोहोचण्याचं आवाहन केलं होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या