Home /News /videsh /

Russia-Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार? जगभरात 'या' गोष्टी महागणार!

Russia-Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार? जगभरात 'या' गोष्टी महागणार!

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukriane War) परिणाम आता महागाईच्या रूपात दिसून येत आहे. कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत अनेक वस्तूंच्या किमती निश्चित करण्यात या देशांची महत्त्वाची भूमिका असल्याने या प्रकरणात दोन्ही देशांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

पुढे वाचा ...
    कीव, 4 मार्च : गेल्या एक आठवड्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. रशिया युक्रेनचं एकएक शहर ताब्यात घेत आहे. तर युक्रेनही मागे हटायला तयार नाही. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होत आहे. अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्या असून, त्याचा परिणाम जगातील विविध देशांतील सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. या वस्तूंच्या किमती निश्चित करण्यात रशिया आणि युक्रेनची महत्त्वाची भूमिका आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महागाई वाढेल जगातील कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत महागाईचा मुख्य चालक इंधनाची किंमत आहे, कारण यामुळे वाहतूक-मालवाहतूक खर्च वाढतो. परिणामी अनेक वस्तू महाग होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीवरून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर (Crude Oil Price) मोठा परिणाम झाला आहे. 2014 नंतर प्रथमच प्रति बॅरल 100 डॉलरचा चा टप्पा ओलांडला आहे. 23 फेब्रुवारीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत 19% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती निश्चित करण्यात रशियाची महत्त्वाची भूमिका आहे, ते दरवर्षी 65 लाख बॅरल तेल निर्यात करते. हे टाळण्यासाठी अनेक देशांनी त्यांच्या धोरणात्मक साठ्याचा अवलंब केला असला तरी भारतासारख्या मोठ्या आयातदार देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे अपरिहार्य वाटते. आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. युक्रेन लष्कराकडून 3 हजार भारतीय ओलीस?, पुतीन यांचा दावा खरा की खोटा? स्वयंपाकाचे तेलही महाग होईल भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. गेल्या दीड वर्षांपासून देशात मोहरीचे तेल (Mustard Oil Price), रिफाइंड तेल (Refined Oil Price) आणि इतर खाद्यतेलाच्या किमतीत (Edible Oil Price) लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या खाद्यतेलाचा (Crude Edible Oil) पुरवठा खंडित होऊ शकतो. दुसरीकडे, सूर्यफूल तेलासाठी (Sunflower Oil), भारत 90% पुरवठ्यासाठी युक्रेन आणि रशियावर अवलंबून आहे. रशिया आणि युक्रेन या तेलाच्या 75% जगभरात निर्यात करतात. अशा परिस्थितीत या तेलाच्या किमतीलाही महागाईचा फटका बसणार आहे. Breaking: भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, अर्ध्या रस्त्यातूनच नेलं कीवला गॅसपासून खतापर्यंत महागाई वाढणार रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगाच्या इंधनाच्या गरजांवरही होणार आहे. रशिया जगातील 17% नैसर्गिक वायूचे उत्पादन करतो. त्याच्या किमती वाढल्यामुळे सर्वच देशांत त्यांच्या किमतींवर परिणाम होईल. त्याच वेळी, जगातील 15% नायट्रोजन खतांचा व्यापार रशियाद्वारे केला जातो. तर पोटॅश खताच्या निर्यातीत रशियाचा वाटा 17% पेक्षा जास्त आहे. याचा परिणाम जगभरातील खतांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या बाबतीत भारताला सध्या आयातीची गरज नाही. परंतु जगातील अनेक देश रशिया आणि युक्रेनच्या गव्हावर अवलंबून आहेत. हे दोन देश जगातील 29% गहू निर्यात करतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या