Home /News /videsh /

मुलीच्या पाठीवर लिहावा लागला पत्ता... Ukraine मधून समोर आला मन हेलावून टाकणारा PHOTO

मुलीच्या पाठीवर लिहावा लागला पत्ता... Ukraine मधून समोर आला मन हेलावून टाकणारा PHOTO

युद्धग्रस्त युक्रेनमधून रोज मन हेलावून टाकणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. अशातच युक्रेनमधला एक फोटो व्हायरल (Ukraine Viral Photo) झाला आहे. या फोटोत एका चिमुकल्या मुलीच्या पाठीवर तिच्या घरचा पत्ता (Adress On Little Girls Back) लिहिल्याचं दिसत आहे.

पुढे वाचा ...
    कीव्ह, 5 एप्रिल: रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाला (Russia Ukraine War) दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. दोन्ही देशांत युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू आहे. परंतु कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. युद्धात आतापर्यंत हजारो युक्रेनियन नागरिक (Ukrainian citizen), सैनिक आणि रशियन सैनिकांना (Russian Army) जीव गमवावा लागला आहे. तसंच युक्रेनमधली अनेक शहरं रशियाच्या हल्ल्यात नष्ट झाली आहेत. या युद्धात दोन्ही देशांची मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. या बातम्या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. अशातच युक्रेनमधला एक फोटो व्हायरल (Ukraine Viral Photo) झाला आहे. या फोटोत एका चिमुकल्या मुलीच्या पाठीवर तिच्या घरचा पत्ता (Ukrainian mother wrote Adresss On Little Girls Back) लिहिल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. युक्रेनमधल्या एका महिलेने आपल्या मुलीच्या पाठीवर घराचा पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर तपशील लिहून ठेवले होते, जेणेकरून ती महिला युद्धात मारली गेली तर तिची मुलगी हरवून जाऊ नये आणि ती सुखरूप घरी पोहोचावी. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नागरिक युक्रेनच्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. घराबाहेर पडल्यानंतर जिवंत परत येणार की नाही, याची खात्री नसल्यानं एका आईला तिच्या मुलीच्या पाठीवर नाव आणि घरचा पत्ता लिहावा लागला आहे. युद्धाची गंभीरता दाखवणारे हे फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. या महिलेने शेअर केलेल्या पोस्टनुसार युद्ध सुरू झाले त्यावेळीच तिने हा तपशील तिच्या मुलीच्या पाठीवर लिहिला आहे. हे वाचा-युक्रेनच्या किवमधलं भयानक वास्तव, रस्त्यावर बेवारस सापडले 410 मृतदेह दीड महिना होऊनही रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले (Russian Attack On Ukraine) सुरूच आहेत. युद्धावर तोडगा काढण्यासाठी बैठका होत आहेत. परंतु त्यातूनही तोडगा निघत नाहीये. युक्रेनमधली शहरं नष्ट झाली असून, इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. रस्त्यावर चहूबाजूंनी जळालेली वाहनं आणि मृतदेहांचे खच दिसत आहेत. युक्रेनमधल्या प्रत्येक शहरावर रशियानं हल्ला केला आहे. हे वाचा-रशियन सैनिकांकडून युक्रेनी तरुणींवर रेप करुन हत्या? खासदाराने शेअर केले भयंकर फोटो दरम्यान, युक्रेनमधल्या बुचा शहरात आतापर्यंत 300 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात नागरिक मारले गेल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. रशियन सैन्याने केवळ पुरुषच नाही तर महिलांनाही हात बांधून डोक्यावर गोळ्या घातल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनने रशियन सैन्याच्या कृत्याची तुलना दहशतवादाशी केली आहे; मात्र रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनचे हे दावे फेटाळून लावले आहेत. रशियाने रविवारी (3 एप्रिल) सांगितलं की युक्रेन रशियाविरोधात खोटे फोटो आणि व्हिडीओ (Fake Photo and Videos of war) प्रसारित करत आहे. रशियन सैन्याने बुचामध्ये कोणत्याही नागरिकावर हिंसाचार केला नाही.
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या