मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पंतप्रधान मोदींचे दोन फोन कॉल, अन् 12 बसमधून 694 भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

पंतप्रधान मोदींचे दोन फोन कॉल, अन् 12 बसमधून 694 भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

Russia-Ukraine War: पूर्व युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेल्या 694 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना पोल्टावा येथे नेण्यात आलं आहे. तेथून ते मायदेशी परत येतील.

Russia-Ukraine War: पूर्व युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेल्या 694 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना पोल्टावा येथे नेण्यात आलं आहे. तेथून ते मायदेशी परत येतील.

Russia-Ukraine War: पूर्व युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेल्या 694 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना पोल्टावा येथे नेण्यात आलं आहे. तेथून ते मायदेशी परत येतील.

नवी दिल्ली,09 मार्च: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेले युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पूर्व युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेल्या 694 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना पोल्टावा येथे नेण्यात आलं आहे. तेथून ते मायदेशी परत येतील. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, सुमीमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, सर्व भारतीयांना प्रथम बसनं पोल्टावा येथे नेण्यात आले, तेथून ते पश्चिम युक्रेनला रेल्वेनंआणि नंतर भारतात पोहोचले.

पोल्टावा ते सुमी अंतर 175 किमी आहे. येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना 12 बसमधून बाहेर काढण्यात आलं. याच्या एक दिवस आधीही विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र युद्धबंदी तुटल्यानं त्यांना बाहेर काढता आलं नाही.

दोन फोन कॉल्सने ऑपरेशन सुरू झालं

24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या परिस्थितीत हजारो भारतीय तेथे अडकले होते, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा (Operation Ganga)सुरू केलं. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 17 हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

मात्र सुमीमध्ये रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र होत होते. सततच्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटामुळे विद्यार्थ्यांना बाहेर काढणं कठीण होत होते. सुमारे 700 भारतीय विद्यार्थी तेथे अडकले होते. दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी 50 मिनिटे आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी 35 मिनिटे चर्चा केली. सुमीमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत पीएम मोदींनी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडे चिंता व्यक्त केली होती. यासोबतच तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मदत मागितली होती.

रशियानं युद्धविराम जाहीर केलं होतं

मंगळवारी रशियानं सकाळी 10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) युद्धविराम जाहीर केला. सुमी ते पोल्टावा या दोन मार्गांवर मानवतावादी कॉरिडॉर बांधण्यात आलं होतं, जेणेकरून तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढता येईल.

सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी 12 बसेसचा ताफा पोहोचला होता. भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीनं या विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Narendra modi, Russia Ukraine