Home /News /videsh /

जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थी जाळतायेत स्वतःच सामान! युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी

जीव वाचवण्यासाठी भारतीय विद्यार्थी जाळतायेत स्वतःच सामान! युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी

Russia-Ukraine War, Indian students share ordeal : आमच्याकडच्या गरजेच्या गोष्टी संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर पडलेल्या वस्तूंमधून आमच्या कामाच्या गोष्टी वापरल्या. वाटेत पडलेल्या इतर आणि कमी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जाळून शरीर उबदार ठेवण्याची व्यवस्था केली.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 4 मार्च : रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून तिथे किती भयानक परिस्थिती आहे, याची कल्पना केली तरी भिती वाटेल. उदाहरण द्यायचं झालं तर, 22 वर्षीय आदित्य, जो युक्रेनमधील टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तो म्हणाला, 'युद्धग्रस्त भागातून शेजारच्या देशांच्या सीमेवर जाणाऱ्या मुला-मुलींचे शरीर थंडीने गोठत आहे. पायी जाताना किंवा टॅक्सीने जाताना आपले सामान त्यांना सोडून जावं लागत आहे. थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी रस्त्यावर पडलेलं आणि प्रसंगी स्वतःच सामान जाळून विद्यार्थी जीव वाचवत आहेत. यात कोणाकडे खायला आहे, तर कोणी इतरांना वाटून आपली तहान भूक भागवत आहे. 3 मार्च रोजी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने उतरलेल्या आदित्यच्या म्हणण्यानुसार, “ज्यावेळी 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हा मी सर्वजण युक्रेनच्या सीमेकडे धावताना पाहिले. आम्ही 5 मित्रांनीही तिथून निघायचं ठरवलं. पोलंडची शेनी सीमा आपल्यापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही दोघांनी मिळून टॅक्सीने जायचे ठरवले. पण टॅक्सी चालकाने आम्हाला तिथून खूप दूर सोडले. त्यानंतर 2-3 दिवस पायी प्रवास करावा लागला. शेनी चौक सीमेच्या आधी सुमारे 3 किलोमीटर आहे. तिथे आम्हाला थांबवण्यात आलं, आम्हाला शिवीगाळ झाली, अगदी मुलींनाही. इतर विद्यार्थी 4-4 दिवस बसून असल्याचे पाहिले. ते पार करण्याची वाट पाहत होते. आम्ही आशा सोडून दिल्या होत्या, पुन्हा टेर्नोपिलला परत जावंसं वाटलं. मात्र, 6-7 तासांनंतर आम्हाला सीमा ओलांडण्याची परवानगी मिळाली. सामान जाळून उब मिळवली.. तो म्हणाला, 'वाटेत आमच्याकडे अन्न-पाणी आणि इतर गरजेच्या वस्तू संपू लागल्या. मग आम्ही सर्वत्र पडलेल्या इतर लोकांच्या सापडलेल्या गोष्टींमधून आमच्या कामाच्या गोष्टी वापरल्या. वाटेत पडलेल्या इतर आणि कमी वापराच्या वस्तू जाळून शरीर उबदार ठेवण्याची व्यवस्था केली. त्याच्या म्हणण्यानुसार, बरेच लोक अद्याप युक्रेनमध्ये कुठे आहेत, हे शोधणे बाकी आहे. त्यात त्याचा मित्र हिमेश आहे. तो 9 दिवसांपासून बेपत्ता आहे. तो अवघ्या 3 महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आला होता. मेडिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. आता कुठे, कोणत्या अवस्थेत असेल मला माहीत नाही. 'मोदीजी आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ', अडकलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश 19 वर्षीय इकरा म्हणाली.. त्याचप्रमाणे 19 वर्षीय इकराही आदित्यसोबत परतली आहे. 'इंडिया टुडे'शी संवाद साधताना ती म्हणाली, 'आमच्या कॉलेजच्या समन्वयकाने आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आमच्यासाठी बसची व्यवस्था केली. जेणेकरून आम्ही रोमानिया सीमेपर्यंत जाऊ शकू. मात्र, जिथून बस निघाली तिथून आम्ही 2 दिवस चालत सीमेवर पोहोचलो. दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला आमचे सामान वाटेतच सोडावे लागले. खार्किव्हमध्ये शिकणाऱ्या माझ्या सहकारी विद्यार्थ्यांसाठी मला खूप भीती वाटते. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आम्ही निघेपर्यंत आम्हाला आमच्या आजूबाजूला स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. खार्किव्हमध्ये युद्ध शिगेला पोहोचले आहे. ते लोक कसे असतील माहीत नाही.'' हे सांगेपर्यंत इकरा भावूक झाली. ती युक्रेनमधील फ्रँकिश नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकते. आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही रशियाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत कशी? युक्रेनमधून परतणाऱ्या जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या सारख्या कथा आहेत. इकडे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (International Airport, New Delhi) मुलांची वाट पाहणाऱ्या पालकांचे डोळे पाणावले जात आहेत. येथे लँड केलेल्या प्रत्येक विशेष विमानासोबत त्यांना आशा आहे की त्यांचे मूल त्यात परत येईल. कुणाची आशा पूर्ण झाली की चेहरे फुलतात. मात्र, ज्यांची प्रतीक्षा आणखी काही तास वाढते, त्यांच्या मनात आपली मुले सुखरूप परत येतील की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या