Home /News /videsh /

Russia-Ukraine युद्धात 5 वा पत्रकार ठार, अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या फोटोग्राफरचा सापडला मृतदेह

Russia-Ukraine युद्धात 5 वा पत्रकार ठार, अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या फोटोग्राफरचा सापडला मृतदेह

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) यांच्यातील युद्ध (War) काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अशातच मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

    कीव, 03 एप्रिल: रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) यांच्यातील युद्ध (War) काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अशातच मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच एक वाईट बातमी समोर येत आहे. या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या पत्रकाराचा (journalist) मृत्यू झाला आहे. युक्रेनियन फोटोग्राफर आणि डॉक्यूमेंट्री मेकर (Ukrainian photographer and documentary maker) मॅक्स लेविन (Max Levin)राजधानी कीवजवळ मृतावस्थेत आढळून आले. 13 मार्च रोजी कीव ओब्लास्टमधील वैशगोरोड जिल्ह्यात युद्धाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी गेलेले लेविन बेपत्ता झाला होते. लेविनने रॉयटर्स, बीबीसी आणि एपीसह अनेक युक्रेनियन आणि आंतरराष्ट्रीय मीडियासह काम केलं आहे. लेविन 40 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. रिपोर्टनुसार, युद्धात मारले गेलेले लेविन हे 5वे पत्रकार आहेत. त्याचवेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी पहाटे आपल्या देशवासीयांना चेतावणी दिली की, रशियन सैन्यानं राजधानीतून माघार घेतल्यानं त्यांच्या बाहेरील भागात मोठी आपत्ती ओढवली आहे, कारण त्यांनी सर्व भागात भूसुरुंग टाकल्या आहेत. त्यांनी घरे आणि मृतदेहांभोवती ही भूसुरुंग सोडल्या आहेत. युक्रेनने रशियन तेल डेपोवर केले हल्ले युक्रेनच्या हल्ल्यामुळे शुक्रवारी सकाळी रशियाच्या बेलगोरोड येथील तेल डेपोमध्ये भीषण आग लागली होती. याचा खुलासा खुद्द बेल्गोरोडच्या राज्यपालांनी केला. त्याच वेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन तेल डेपोवर हल्ला करण्याचे आदेश देण्याच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, झेलेन्स्की म्हणाले की सर्वोच्च कमांड म्हणून ते जे आदेश देतात ते कोणाशीही चर्चा करत नाहीत. याआधी युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी शुक्रवारी बेल्गोरोडमधील तेल डेपोवर दोन युक्रेन हेलिकॉप्टरने धडक दिल्याचा मॉस्कोचा आरोप नाकारला. बेल्गोरोडच्या गव्हर्नरने सांगितलं की, डेपोमध्ये दोन कामगार जखमी झाले आहेत, मात्र रशियन मीडियानंतेल कंपनी रोझनेफ्तच्या वक्तव्याचा हवाला देऊन कोणीही जखमी झाल्याचं नाकारलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या