Home /News /videsh /

Russia-Ukraine War: युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच, घरावर टाकला 500 किलो वजनाचा बॉम्ब

Russia-Ukraine War: युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच, घरावर टाकला 500 किलो वजनाचा बॉम्ब

Russia-Ukraine War: युक्रेनची (Ukraine)राजधानी कीवमध्ये युद्धाचं संकट अधिक गडद होत आहे. रशियन सैन्यानं कीवला चारही बाजूंनी वेढलं आहे आणि कीवपासून सैन्याचे अंतर हळूहळू कमी होत आहे.

    कीव,07 मार्च: युक्रेनची (Ukraine)राजधानी कीवमध्ये युद्धाचं संकट अधिक गडद होत आहे. रशियन सैन्यानं कीवला चारही बाजूंनी वेढलं आहे आणि कीवपासून सैन्याचे अंतर हळूहळू कमी होत आहे. युक्रेनमध्ये नुकसान ही जास्त होत आहे. अशा स्थितीत युक्रेनच्या (Foreign Minister) परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या व्यथा ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कलेवा यांनी ट्विटरवर महाकाय बॉम्बचे फोटो पोस्ट केले आहेत आणि फोटोसोबतच त्यांनी असंही म्हटलं आहे की, अशा बॉम्बमुळे आपल्या देशातील लोकांचा जीव जात आहे. यासोबतच युक्रेनला लढाऊ विमान देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. दिमित्री कलेवा यांनी ट्विटरवर फोटोसह लिहिलं की, हा भयानक 500 किलोचा रशियन बॉम्ब चेर्निहाइव्हमधील एका घरावर पडला आहे. पण तो फुटला नाही. अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्यात निष्पाप पुरुष, महिला आणि लहान मुले मारली जात आहेत. आम्हाला आणि आमच्या लोकांना रशियापासून वाचवण्यास मदत करा! आमचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आम्हाला मदत करा. आम्हाला लढाऊ विमाने द्या, काहीतरी करा!' रशियानं युक्रेनच्या विमानतळावर डागली 8 मिसाईल रविवारी रशियन (Russian Army)लष्करानं क्षेपणास्त्र हल्ल्यात (Missile Attack)विनित्सिया विमानतळ उद्ध्वस्त केलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी ही माहिती दिली. या विमानतळावर रशियन सैन्यानं एकामागून एक 8 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मला नुकतीच माहिती मिळाली आहे की विनित्सियामध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. येथे रशियन सैन्यानं विमानतळावर 8 क्षेपणास्त्रे डागली आहेत, ज्यामुळे हे विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाला 11 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. यादरम्यान, रशियन सैन्यानं युक्रेनमधील अनेक शहरे आणि हवाई तळांना लक्ष्य केलं आहे. जिथे त्यांनी क्षेपणास्त्रे आणि प्राणघातक बॉम्ब हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या