मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाच्या सैनिकांचा मृत्यू, पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी

Russia-Ukraine War: युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाच्या सैनिकांचा मृत्यू, पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 25 फेब्रुवारी रोजी शेजारील देशावर लष्करी कारवाईची घोषणा केली होती.

  • Published by:  Pooja Vichare
मॉस्को, 03 मार्च: युक्रेनसोबत (Ukraine) सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत रशियाचे (Russia) 498 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे 1600 जवान जखमी झाले आहेत. रशियाच्या लष्करानं बुधवारी ही माहिती दिली. त्याचवेळी, रशियन संरक्षण मंत्रालयानंही 'अगणित' मृत्यूचा दावा फेटाळून लावला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 25 फेब्रुवारी रोजी शेजारील देशावर लष्करी कारवाईची घोषणा केली होती. इंग्रजी वेबसाइट RT नुसार, रशियन सैन्यानं अंदाज व्यक्त केला आहे की युक्रेनच्या लष्करी तुकड्यांमध्ये आणि निमलष्करी दलात 2 हजार 870 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 3700 जखमी झाले आहेत. रशियन मंत्रालयानं असंही सांगितलं की, यावेळी युक्रेनच्या 572 सैनिकांनाही कैद करण्यात आले आहे. मात्र, याआधीही सुरू असलेल्या युद्धात हजारो रशियन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागल्याचं वृत्त समोर आले होतं. मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी बुधवारी "चुकीची माहिती" म्हणून फेटाळून लावलं की रशियाचे "अगणित नुकसान" झालं आहे. गुरुवारी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच रशियन सैनिकांचं नुकसान झालं आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मीडिया रिपोर्ट्समध्ये आरोप केल्याप्रमाणे युक्रेनमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये लोक किंवा कॅडेट्स दोघांनाही जबरदस्तीने भरती करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला की, 4,500 हून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी रशियन आक्रमणानंतर युक्रेनमध्ये किमान 102 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून दिसून येते. यामध्ये सात मुलांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचेलेट यांनी जिनेव्हा येथील मानवाधिकार परिषदेला सांगितलं की वास्तविक आकडेवारी जास्त असू शकते.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या