Home /News /videsh /

हातावर लिहिलेला फोन नंबर आणि आईची चिठ्ठी...युद्धादरम्यान 11 वर्षीय चिमुकल्याने केला 1000 किमीचा प्रवास

हातावर लिहिलेला फोन नंबर आणि आईची चिठ्ठी...युद्धादरम्यान 11 वर्षीय चिमुकल्याने केला 1000 किमीचा प्रवास

युद्धादरम्यान एक 11 वर्षीय युक्रेनी मुलगा स्लोवाकियामध्ये 1000 किलोमीटरचा प्रवास पार करुन पोहोचला आहे. या प्रवासात त्याच्यासोबत एक बॅकपॅक, त्याच्या आईने लिहून दिलेला मेसेज आणि हातावर लिहिलेला एक फोन नंबर होता.

  नवी दिल्ली, 7 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठी जीवित तसंच वित्त हानीही होते आहे. युद्धाच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक जण आपापल्या देशात परतत आहेत किंवा आपल्या कुटुंबियांसह देश सोडून इतर दुसऱ्या देशात जात आहेत. अशा परिस्थितीत एका चिमुकल्याने तब्बल 1000 किलोमीटरचा पल्ला एकट्याने पार केला आहे. युद्धादरम्यान एक 11 वर्षीय युक्रेनी मुलगा स्लोवाकियामध्ये 1000 किलोमीटरचा प्रवास पार करुन पोहोचला आहे. या प्रवासात त्याच्यासोबत एक बॅकपॅक, त्याच्या आईने लिहून दिलेला मेसेज आणि हातावर लिहिलेला एक फोन नंबर होता. या मुलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा मुलगा दक्षिण-पूर्व युक्रेनच्या जापोरिज्जिया येथील राहणारा आहे. एका आजारी असलेल्या नातेवाईकांची देखभाल करण्यासाठी या मुलाच्या आई-वडिलांना युक्रेनमध्ये राहवं लागलं. अशा युद्धाच्या स्थितीत आपल्या मुलाला युक्रेनमधून बाहेर काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

  हे वाचा - युक्रेनमध्ये शॉपिंग सेंटर लुटताना दिसले सामान्य नागरिक, दृश्य कॅमेऱ्यात कैद

  मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आईने त्याला त्यांच्या स्लोवाकिया येथील नातेवाईकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. स्लोवाकिया येथे पोहचल्यानंतर तेथील नातेवाईकांना शोधण्यासाठी त्यांच्या आईने एक चिठ्ठी लिहून दिली होती. मुलाकडे एक प्लॉस्टिक बॅग, पासपोर्ट आणि मेसेज लिहिलेला कागद होता.

  हे वाचा - युक्रेनमधला आतापर्यंतचा सर्वात भयानक VIDEO, रशियन सैन्याचा नागरिकांवर हल्ला

  या सामानासह मुलगा स्लोवाकिया इथे पोहोचला. त्यानंतर सीमेवरील अधिकाऱ्यांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर मुलाला त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्या मुलाकडील चठ्ठीत त्यांच्या आईने स्लोवाकिया सरकार आणि पोलिसांचे आपल्या मुलाची काळजी घेतल्याबाबत आधीच आभार व्यक्त केले होते. स्लोवाकिया मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एका पोस्टमध्ये याबाबत माहिती देत सांगितलं, की त्या मुलाच्या हातावर लिहिलेला नंबर, कागदावर लिहिलेल्या मेसेजमुळे मदत झाली. आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात यशस्वी झालो आणि मुलाचा सुरक्षित त्यांच्याकडे पोहोचला. मुलाने इतका मोठा स्लोवाकियापर्यंतचा लांबचा पल्ला एकट्याने पार केला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू, त्याचा आत्मविश्वास आणि न घाबरता त्याने हा प्रवास पाहून स्लोवाकिया बॉर्डरवर पोहोचल्यानंतर तेथील अधिकारीही हैराण होते. स्लोवाकियाच्या गृहमंत्रालयाकडून एकाफेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. कालच्या रात्रीचा सर्वात मोठा हिरो असं म्हणत ही फेसबुक पोस्ट केली गेली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Russia Ukraine

  पुढील बातम्या