मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia Ukraine Crisis: कीवच्या आकाशात मिसाईलचा थरार, रशियाच्या हल्ल्याचा ताजा Live Video

Russia Ukraine Crisis: कीवच्या आकाशात मिसाईलचा थरार, रशियाच्या हल्ल्याचा ताजा Live Video

Russia Ukraine Crisis: रशियानं (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेनमध्ये नुकतीच सकाळ झाली आहे.

Russia Ukraine Crisis: रशियानं (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेनमध्ये नुकतीच सकाळ झाली आहे.

Russia Ukraine Crisis: रशियानं (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेनमध्ये नुकतीच सकाळ झाली आहे.

  कीव, 26 फेब्रुवारी: रशियानं (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेनमध्ये नुकतीच सकाळ झाली आहे. मात्र सकाळी उठताच तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये सध्या जोरदार गोळीबार सुरू आहे. कीवच्या आकाशात लढाऊ विमानाचा आवाज ऐकू येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ रात्रीचा आहे. रस्त्यावर शांतता आहे. मात्र गोळ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. लोक आपापल्या घरात लपून बसले आहेत, काही लोकांनी घरे सोडली आहेत आणि संधी मिळताच सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत. कीवजवळ रशियन विमान पाडलं युक्रेनच्या लष्करानं काल रात्री उशिरा राजधानी कीवजवळ रशियन विमान पाडल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप याला स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही. Il-76 विमाने सामान्यतः जड वाहतूक आणि पॅराट्रूपर ऑपरेशन्ससाठी चालविली जातात. युक्रेननं 60 रशियन सैनिक मारल्याचा दावा रशियन लष्करी विमान पाडल्यानंतर युक्रेननं आता आपला दुसरा दावा केला आहे. युक्रेनियन सैन्यानं म्हटलं आहे की, हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारी रोजी कीवमध्ये 60 रशियन सैनिक मारले गेले. त्याच वेळी, रशियन सैनिक कीवच्या दक्षिणेस 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या Vasylkiv मध्ये घुसले होते. युक्रेननं या सैनिकांना तोडफोड करणारे घटक म्हटलं आहे. तसंच वासिल्किवमध्ये रशियन सैनिकांशी चकमक झाल्याचं सांगितलं. युक्रेनचा दावा आहे की, रशियन पॅराट्रूपर्सने 37 हजार लोकसंख्येच्या Vasylkiv शहरावर हल्ला केला. यामध्ये युक्रेनच्या लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. युक्रेनचे 137 सैनिक ठार, रशियाचा आकडा 1000 वर रशिया-युक्रेन युद्धात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, तीन दिवस चाललेल्या युद्धात त्यांच्या 137 वीरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी 10 लष्करी अधिकारी आहेत. युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की त्यांनी 1000 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. त्याचवेळी, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे की, त्यांनी युक्रेनमधील 211 लष्करी तळ नष्ट केले आहेत. येथे युक्रेनचा दावा आहे की, त्यांनी किमान 80 रशियन टँक, 516 चिलखती वाहने, 7 हेलिकॉप्टर, 10 एयरक्राफ्ट विमाने आणि 20 क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. कीवच्या ताब्यासाठी लढाई सुरूच राजधानीतील मैदान स्क्वायरमध्ये भीषण स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. याशिवाय शहरातील ट्रोइश्चीना परिसरात अनेक स्फोट झाल्याची माहिती आहे. युक्रेनच्या राज्य विशेष सेवेनुसार, राजधानीच्या ट्रोइशीनामधील सीएचपी -6 पॉवर स्टेशनजवळ लढाई सुरू आहे. दरम्यान रशियन सैनिक शहराचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कीवमध्ये सर्वत्र धोकादायक स्फोट CNN च्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये गेल्या काही तासांपासून शहराच्या पश्चिम आणि दक्षिणेला जोरदार स्फोट झाल्याचं वृत्त आहे. रशियाचा युक्रेनवर हल्ला गुरुवारपासून सुरू झाला आणि झपाट्यानं देशभर पसरला. रशियन सैन्यानं जमीन, समुद्र आणि हवा अशा तिन्ही बाजूंनी हल्ला केला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Russia Ukraine, Ukraine news

  पुढील बातम्या