रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. युक्रेनमधील प्रमुख शहरं रशियाच्या हल्ल्यामुळे बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
नवी दिल्ली, 11 मार्च: गेल्या 15 दिवसांपासून रशिया (Russian) युक्रेनवर (Ukraine) सातत्याने हल्ला करत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. युक्रेनमधील प्रमुख शहरं रशियाच्या हल्ल्यामुळे बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये रशियाने टाकलेला बॉम्ब काही व्यक्ती पाण्याच्या बाटलीने निकामी (Bomb Defused With Water Bottle) करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये युक्रेनचे सैनिक रशियाने टाकलेला एक विशाल बॉम्ब निकामी करताना दिसत आहेत. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी दोन व्यक्तींनी आपला जीव धोक्यात घालून बॉम्ब निकामी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे,बॉम्ब निकामी करण्यासाठी त्यांनी पाण्याच्या बॉटला वापर केला आहे.
जो बॉम्ब दोन लोक फक्त हाताने निकामी करताना दिसत होते तो बॉम्ब सामान्य नाही. सीरिया आणि काउंटरिंग टेररिझम अँड एक्स्ट्रिमिझम प्रोग्रामचे डायरेक्टर चार्ल्स लिस्टर यांनी सांगितले की, हा बॉम्ब एवढा शक्तिशाली आहे की तो मोठ्या इमारतीवर जमिनदोस्त करु शकतो.
बॉम्बचा धोका कळल्यानंतरही हे दोघे हाताने तो निकामी करताना दिसले. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे. . लिस्टर पुढे म्हणाले की हे स्वतःच अत्यंत धैर्याचे उदाहरण आहे. स्काय न्यूजचे पत्रकार निक स्टॅलियानो यांनी सांगितले की, एक व्यक्ती बॉम्बला हाताने निकामी करताना बॉम्बवर सतत पाणी टाकत होता. पुढे तो म्हणाला की, त्याला स्टीली सीना म्हणतात. रशिया युक्रेनवर असे बॉम्ब टाकत आहे ज्यामुळे लोकांच्या अंतर्गत अवयवांना इजा होत असल्याची बातमी आली तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल आला.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.