कोरोना लशीवरही हॅकर्सचा डोळा; डेटा चोरीचा प्रयत्न करत असल्याचा रशियावर आरोप

कोरोना लशीवरही हॅकर्सचा डोळा; डेटा चोरीचा प्रयत्न करत असल्याचा रशियावर आरोप

रशियातील हॅकर्स (Russian hackers) कोरोना लशीचा (corona vaccine) डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Share this:

लंडन, 16 जुलै : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) महासाथीत परिस्थितीचा फायदा आता हॅकर्सही घेऊ लागलेत. बँक अकाऊंट, सोशल मीडिया या सर्वांवर हॅकर्सचा (hackers) डोळा तर आहेच शिवाय आता कोरोना लशींवरही (corona vaccine) हॅकर्सनी आपलं लक्ष वळवलं आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस तयार करण्यात जुटलेत आणि काही देशांच्या लशींचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. याबाबत रशियावर आरोप लावण्यात आला आहे.

रशियातील हॅकर्स (Russian hackers) कोरोना लशीचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप यूके, यूएस आणि कॅनडाने केला आहे. ब्रिटन नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर्सने (NCSC) याबाबत माहिती दिली आहे.

NCSC ने सांगितल्याप्रमाणे, APT29 ग्रुप जो कोझी बिअर (Cozy Bear) म्हणूनही ओळखला जातो, जो रशियन गुप्तचर सेवेचा भाग होता, त्यांच्यामार्फत  कोरोना लशीचा डेटा चोरण्याच्या प्रयत्न केला जातो आहे. हा ग्रुप वेगवेगळे टूल आणि टेक्निकचा वापर करत आहे.

NCSC चे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन पॉल चिस्टेर म्हणाले, कोरोनाशी लढा देण्यासाठी सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यावर हल्ला करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.

हे वाचा - WhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे? मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल

दरम्यान रशियाने यूकेचा हा आरोप फेटाळला आहे. या आरोपांना कोणत्याही पुराव्यांचा आधार नाही. असं प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाल्याचं वृत्त रशियन वृत्तसंस्था RIA दिलं आहे. 

Published by: Priya Lad
First published: July 16, 2020, 11:01 PM IST

ताज्या बातम्या